Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : आयशरच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जखमी !
    क्राईम

    धरणगाव : आयशरच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जखमी !

    editor deskBy editor deskDecember 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    धरणगावनजीक पवार पेट्रोल पंपाजवळ आयशरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर लोटू अत्तरदे (५८) भाऊ, मुलगा, मुलगी हे नागपूरहून रेल्वेने धरणगाव रेल्वेस्थानकावर आले. त्यांना घेण्यासाठी मोरेश्वर अत्तरदे हे धरणगावला आले होते. लहान मुलांना सोबत घेवून दुचाकीने साळव्याकडे जात असताना धरणगावच्या बाहेर चोपडा रस्त्यावरील पवार पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली.

    या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे पाहून आयशर चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान गंभीर जखमी मोरेश्वर अत्तरदे यांना पुढील उपचारासाठी जळगावला आणत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू ओढविला. तर दुचाकीवरील मुलगा व मुलगी दोघांना नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मयत मोरेश्वर अत्तरदे हे अविवाहित होते. पश्चात वडील, भाऊ, असा परिवार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.