Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » केमिकल ट्रकची जबर धडकेत : म्हशीसह एकाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    केमिकल ट्रकची जबर धडकेत : म्हशीसह एकाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विटनेर : प्रवीण पाटील

    जळगाव तालुक्यातील नेरी – म्हसावद रस्त्यावर एका केमिकल ट्रंकने रस्त्यावरून जाणाऱ्या म्हशीसह एकाला उडविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एक व्यक्ती व एक म्हैस जागीच ठार झाले असून एक म्हैस गंभीर जखमी झाले आहे. हि घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने सुमारे तीन तास ट्राफिक जाम झाली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नेरी – म्हसावद रस्त्यावर विटनेर या गावात अनेक शेतकरी व पशुपालक राहतात, आज दि.१९ रोजी दुपारच्या सुमारास म्हशी चारवून घरी येत असतांना भरदुपारी नेरी – म्हसावद रस्त्यावर केमिकल ट्रंक (जी.जे.१२.बी.व्ही.७४७५) ने भरधाव येत रस्त्याने जाणाऱ्या म्हशीसह सुका पंडित सोनवणे यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक म्हैस गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती गावासह परिसरात वाऱ्याच्या वेगात पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुमारे तीन तास रस्त्यावर ठिय्या दिल्याने रस्त्यावर मोठी ट्राफिक जाम झाली होती. या रस्त्यावर नेहमीच असे छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिक आक्रमक झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यत यावर कुठलाही मार्ग निघालेला नव्हता तर घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्थानका कर्मचारी दाखल होत असल्याचे देखील समजत होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सराफा दुकानात ग्राहक बनून प्रवेश; ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल लंपास!

    June 12, 2026

    मद्याच्या नशेत घरी जाताना दुर्दैव; आदिवासी दांपत्याचा पाण्यात बुडून अंत

    June 12, 2026

    चोपड्यात बालकामगारांचे शोषण उघड; न्यू बापू टी हाऊसच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

    June 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.