Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेकायदेशीर वाहतूक : साडेआठ लाखांचा गुटखा पकडला !
    क्राईम

    बेकायदेशीर वाहतूक : साडेआठ लाखांचा गुटखा पकडला !

    editor deskBy editor deskDecember 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : वृत्तसंस्था

    मध्य प्रदेशातून इच्छापूर हद्दीमधून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या एका चारचाकी गाडीतून सुमारे साडेआठ लाखांचा गुटखा मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी शहरातील प्रवर्तन चौकाजवळ करण्यात आली. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, संदीप वानखेडे, दीपक ठाकरे, राहुल बेहेनवाल यांच्या पथकाने मुक्ताईनगर प्रवर्तन चौकाजळ संशयित चारचाकी गाडी क्रमांक (एमपी ६८, झेडए ९८६२) ताब्यात घेतली. या कारची तपासणी केली असता, सुगंधी तंबाखू व गुटखा सापडला, पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला होता. वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन जोरात पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शहरात प्रवर्तन चौकात नाकाबंदी लावून वाहनधारकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या चारचाकी गाडीतून पान मसाला, गुटखा, तंबाखू असा सुमारे ८ लाख २९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शेख अबिद शेख जहीर (३०, रा. राजघाट काली मशीदजवळ, बन्हाणपूर) याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल बोरकर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.