सांगली : वृत्तसंस्था
शहरातील एका नामांकित शिक्षणसंस्थेत सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत चाळे करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला.
शिक्षकाने चाळे केल्याची माहिती घाबरलेल्या विद्यार्थिनीने मैत्रिणींना दिली. त्यावेळी अन्य काही विद्यार्थिनींनीही आपल्यासोबतही सरांनी असेच कृत्य केल्याचे सांगितले.
ही बाब पालकांपर्यंत पोहोचली. त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना माहिती दिली. त्यानंतर सावंत पालकांसह शाळेत गेले. मुख्याध्यापक, संस्थाचालक व संबंधित शिक्षक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. शिक्षकाकडे सखोल विचारणा केली असता, त्याने प्रथम कानावर हात ठेवले; पण विद्यार्थिनींपुढे तोंड बंद ठेवले. त्यानंतर संतप्त पालक व मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. शिक्षकाने माफी मागण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते आक्रमक झाले होते.