Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महिला विभाग, शाखा तसेच उपशाखा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दांत सुनावल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामात शिथिलता दिसून येत असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. “तुम्ही खाली काय करता याची मला पूर्ण माहिती मिळते. कोण काय काम करतंय आणि कोण निष्क्रिय आहे,…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हरताळा फाट्यावर गुरुवारी सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्टिगा कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन धडकली. या धडकेत प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे जखमी झाले. अपघाताचा आवाज मोठा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची घटना घडली आहे. सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी ई-मेलद्वारे विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणी बॉम्ब धमकी देण्यात आली, ज्यात विधान भवन, मुंबई शेअर बाजार, मुंबई मेट्रो आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा समावेश होता. घटनेनंतर विधान भवनात तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तसेच इमारतीत प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला. पोलिसांच्या वतीने विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून सर्व परिसर कसून तपासला जात आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, धमकी मिळालेल्या ई-मेलमध्ये स्फोट…

Read More

पाचोरा :  प्रतिनिधी बाथरूममध्ये वाॅटर हिटरचा शाॅक लागल्याने एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील हनुमान नगर येथे घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  धनराज सुखदेव मिस्तरी (वय – ४४ वर्ष) रा. ए वन काट्याजवळ, हनुमान नगर, पाचोरा असे मयताचे नाव असुन धनराज मिस्तरी हे ११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे घराच्या बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले असता बाथरूममध्ये असलेल्या वाॅटर हिटरचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धनराज मिस्तरी यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी धनराज मिस्तरी यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी  येथे काल रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने मिळून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. मात्र, सायंकाळपर्यंत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल न झाल्याने नेमके काय चोरी झाली, याची माहिती मिळाली नाही. यामुळे पाळधीत खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  येथील साईबाबा नगरमधील रहिवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलुप होते. नेमके याचीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट उघडून त्यातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ते आज सकाळी घरी आले असता त्यांना घराचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून रसाल गमन राठोड (वय ४८, रा. जुना आसोदा रोड) यांना पाच जणांनी दारुच्या नशेत असतांना मारहाण केली. ही घटना दि. १० मार्च रोजी स्मशानभूमी परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जुन्या वादातून पाच जण सुनील रसाल राठोड याला शोधत होते. त्या वेळी त्याचे वडील रसाल राठोड हे दिसल्याने त्यांना एका जणाने ‘तुझा मुलगा सुनील कोठे आहे, आज मी त्याला मारुन टाकेल’, असे म्हणत धमकी दिली. तसेच पाच जणांनी मारहाण केली. या प्रकरणी रसाल राठोड यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या हिमांशू नवीन साखला,…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस आमोदा येथील तरुणाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह घरी असताना आमोदा येथील तरुणाने ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिला आमिष दाखवून फूस लावली. पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटना लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

आजचे राशीभविष्य दि. १२ मार्च २०२६ मेष राशी अभियंत्यांना आज एक चांगला प्रकल्प मिळेल, जो त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प असेल. तुम्ही अशा उपक्रमांना पाठिंबा द्याल ज्या तुमच्यासाठी फायदेशीर असतील. तुमचे आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे तुमचे सर्व काम सुरळीत होईल. तुम्ही आज तुमच्या मुलांना प्राणीसंग्रहालयात घेऊन जाल, जिथे ते खूप मजा करतील. कौटुंबिक बाबी पूर्ण करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. वृषभ राशी आज तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी वाट पाहत आहेत. पण त्या साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करत राहावे लागतील. ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांना टीव्ही शोमध्ये गाण्याची ऑफर मिळू शकते. तुम्ही आज महागडी खरेदी करण्याचा विचार देखील करू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रकल्पांसाठी होणाऱ्या जमीन संपादनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, या प्रकरणाची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील ‘विशेष तपास पथकामार्फत’ ( एसआयटी ) सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या समितीमध्ये दोन आयएएस आणि एक आयपीएस दर्जाचा अधिकारी असेल, जेणेकरून या प्रकरणातील फौजदारी बाबींचीही तपासणी होईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणातील आणि विविध विभागांच्या संशयास्पद भूमिकेवर लक्षवेधी सूचना मांडली होती. सहा विभागांची होणार चौकशी या प्रकरणाचे स्वरूप व्यापक असून यामध्ये केवळ महसूल विभागच नाही, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुद्रांक शुल्क…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बचत खात्यात किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत मासिक सरासरी शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून दंडाच्या स्वरूपात तब्बल ८,०९२.८३ कोटी रुपये वसूल केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली. लोकसभेत खासदार सुरेश कुमार शेतकर  आणि सौगत रॉय यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी बँका किमान शिल्लक न ठेवल्यास किती दंड वसूल करतात आणि हा नियम रद्द करण्याबाबत…

Read More