मुंबई : वृत्तसंस्था मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवत आहेत. युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामान्य नागरिकांवर होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एलएनजी गॅसच्या कमतरतेमुळे उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे 30 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळते. विशेषतः ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योग या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक उद्योगांकडे फक्त दोन दिवस पुरवठा होईल एवढा गॅस साठा उरला आहे. केंद्र सरकारने गॅस वापर केवळ घरगुती एलपीजीसाठी राखीव ठेवल्याने औद्योगिक गॅस पुरवठा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताच्या तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत. या दुर्घटनेत पायलटची चूक असण्याची शक्यता व्यक्त करत व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी गुन्हे अन्वेषण विभागासमोर महत्त्वाचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात माझी काही चूक आढळल्यास कठोर शिक्षा द्यावी, असे त्यांनी चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या अपघातानंतर या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू असून संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेबाबत अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहीत पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत विमान कंपनीच्या कार्यपद्धतीतील काही…
जळगाव : प्रतिनिधी पोलिस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात पसार असलेले पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर पोलिसांना शरण आले. सोमवारी (९ मार्च) त्यांना व त्यांचा मुलगा शेखर वाघ याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्या बँक खात्याची चौकशी केली. यामध्ये अपहार काळात मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाल्मीक वाघ हे पसार असल्याने…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस परिसरातील कवाडेनगर येथे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ९) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विजेश अण्णा शिंदे (२२) असे असून तो कुटुंबासह कवाडेनगर येथे राहत होता. सोमवारी सकाळी कुटुंबीय त्याला बोलवण्यासाठी खोलीत गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात बबलू नेटेकर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे हलविण्यात आला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी नैसर्गिक मृत्यूला अपघात दाखवून तब्बल ५० लाख रुपयांचा विमा लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी, चार पोलिस कर्मचारी आणि मृताचे कुटुंबीय अशा आठ संशयितांना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, मेहुणबारे पोलिस ठाण्यातील कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र बत्तीशे, सचिन निकम सुनील निकम यांच्यासह मृताची पत्नी अरुणा जाधव, भाऊ मिथुन जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील राजेंद्र जालंदर जाधव यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्यावर अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार…
आजचे राशीभविष्य दि.१० मार्च २०२६ मेष राशी शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यात व्यस्त असतील. आज तुमचा व्यवसायातील नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या जुन्या प्रकरणामुळे गोंधळून जाल. तुमच्या कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाणे फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला आर्थिक मदत करू शकाल. घरातील बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस आरामदायी वाटेल. तुमच्या मोठ्या बहिणीचा सल्ला फायदेशीर ठरेल. रंगपंचमीला तुमचे प्रेम जीवनही सुधारेल. वृषभ राशी आज, तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी दयाळूपणे वागाल आणि तुमचे शब्द काहींना प्रभावित करतील. आर्थिक स्थैर्य राहील. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जेवायला जाऊ शकता. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना हा दिवस संस्मरणीय…
जळगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना उलट जळगावातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात सुमारे १५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात २००० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगाव सराफा बाजारात शनिवारी सोन्याचा दर (जीएसटीशिवाय) सुमारे १ लाख ६१ हजार रुपये प्रति तोळा होता.…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रविवारी (९ मार्च) सायंकाळी सुमारे ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५) या आपल्या कुटुंबासह ७ मार्च रोजी नाशिक येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ७ मार्च रोजी रात्री ११ ते ८ मार्च रोजी सकाळी ७.३० या दरम्यान कृष्ण गीता नगर येथील त्यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे…
मुंबई : वृत्तसंस्था इयत्ता दहावी व बारावीच्या यंदाच्या बोर्ड परीक्षांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मास कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 81 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित केंद्रांवरील गैरप्रकारांचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून समोर आल्यानंतर राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक 224) सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. प्रशासनाने या प्रकरणी 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले. विशेष म्हणजे, हा प्रकार परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारीला घडल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात डीबी रायटर म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथे राहत्या घरी गळफास घेत जीवन संपविल्याची घटना सोमवारी (दि. सकाळी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश पाटील हे डीबी रायटर म्हणून कार्यरत होते. मूळ चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी असलेले निलेश पाटील शनिवारी गावी एक कार्यक्रमासाठी गेले होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. सोमवारी सकाळी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमीत मनेल यांनी भेट दिली असून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा सुरू असून मृताचा मोबाईल ताब्यात घेण्यात…

