आजकाल प्रत्येकालाच चमकदार, निरोगी आणि निर्दोष त्वचा हवी असते. त्यामुळे अनेकजण स्किनकेअर रूटीनमध्ये विविध प्रकारचे सीरम वापरतात. विशेषतः व्हिटॅमिन सी सीरम त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी खूप लोकप्रिय झाले आहे. बाजारात अनेक ब्रँडचे व्हिटॅमिन सी सीरम उपलब्ध असले तरी त्यामध्ये अनेकदा प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा रासायनिक घटक असतात. संवेदनशील त्वचेसाठी हे केमिकल कधी कधी हानिकारक ठरू शकतात. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती व्हिटॅमिन सी सीरम हा एक सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. घरगुती सीरम नैसर्गिक घटकांपासून तयार केले जात असल्यामुळे त्यात केमिकलचा वापर नसतो. कोरफड, गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक त्वचेला पोषण देतात तसेच त्वचा हायड्रेट ठेवण्यास…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील इच्छामृत्यू संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १३ वर्षांपासून कोमात असलेल्या ३१ वर्षीय हरीश राणा यांना इच्छामृत्यूची परवानगी दिली आहे. न्यायालयाने एम्स रुग्णालयाला हरीश यांना पेलिएटिव्ह केअरमध्ये दाखल करून जीवनरक्षक उपचार टप्प्याटप्प्याने काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना स्पष्ट केले की ही प्रक्रिया रुग्णाची प्रतिष्ठा कायम ठेवून आणि मानवी दृष्टिकोनातून केली पाहिजे. हरीश राणा हे मूळ दिल्लीचे रहिवासी असून ते चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होते. २०१३ साली वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला…
छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर–धुळे महामार्गावर बुधवारी दुपारी एक भीषण घटना घडली. शहादा डेपोची शहादा–संभाजीनगर एसटी बस पळसवाडी शिवारातील हॉटेल आम्रपाली समोर थांबलेली असताना अचानक पेट घेतला. सुदैवाने सर्व प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असल्याने ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला, मात्र काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस शहादा येथून संभाजीनगरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. दुपारी सुमारे ४ वाजता चालक व वाहकाने पळसवाडी येथे जेवणासाठी बस थांबवली. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. प्राथमिक माहितीनुसार, बस दीर्घकाळ सतत धावत असल्यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी पोलीस दलाच्या वेल्फेअरअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी अपहार झालेल्या काळात आपल्या मुलाच्या खात्यात तब्बल १० लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर त्यांनी सोने खरेदी केल्याचेही उघड झाले असून अपहाराची रक्कम सोने किंवा अन्य कोणाच्या नावावर मालमत्ता खरेदीसाठी वापरली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास अधिकारी पोनि राहुल गायकवाड यांनी ही माहिती न्यायालयासमोर मांडली. त्यानुसार न्यायालयाने संशयित वाघ यांना १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलीस दलातील वेल्फेअरतर्फे चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून पीएसआय वाल्मिक वाघ यांची नियुक्ती करण्यात आली होती. १२…
एरंडोल : प्रतिनिधी शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्या नराधमासह एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात चार वर्षीय चिमुकली वास्तव्यास असून त्यांच्या घराशेजारीच तीचा मामा देखील वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमुकली घरी एकटी असल्याचे पाहून संशयिताने तीला स्वतःच्या घरी नेले. त्याठिकाणी चिमुकलीसोत घृणास्पद कृत्य करीत तिच्यावर अत्याचार केला काही वेळानंतर चिमुकल्या मुलीची आई घरी आल्यानंतर तिला मुलगी दिसून न आल्याने तीने आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये तिचा शोध यावेळी तिला भावाच्या घरात चिमुकली मिळून आली. दरम्यान, चिमुकलीला घेवून तीची आई,…
जळगाव : प्रतिनिधी अमरावती येथील एका ३० वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार करीत बळजबरीने तिचा गर्भपात आणल्याप्रकरणी घडवून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी प्रसाद सुरेंद्र खंडेलवाल याच्यासह त्याच्या कुटुंबातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अमरावती येथे एका सरकारी कार्यालयात कार्यरत असून, तिचा परिचय डिसेंबर २०२४ मध्ये एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून प्रसाद सुरेंद्र खंडेलवाल (रा. अयोध्यानगर, जळगाव) याच्यासोबत झाला होता. संशयित आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन नाशिक आणि जळगाव येथील हॉटेल व मंगल कार्यालयात पीडितेवर तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.…
जळगाव : प्रतिनिधी शहरात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ९ मार्च रोजी घडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सलमान सगीर काकर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पीडित तरूणी ही तांबापुरा परिसरातून जात असताना संशयित आरोपी सलमान सगीर काकर याने पीडित तरुणीचा पाठलाग करीत तरुणीकडे लग्नाची मागणी केली. पीडितेने याला विरोध केला असता, आरोपीने तिला धमकी धमकीही दिली. तपास पोलिस हवालदार गणेश वंजारी करत आहेत.
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील आदिवासीबहुल गारखेडा परिसरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गारखेडा येथील उपकेंद्रात परिचारिका व इतर सुविधा नसल्याने आशा सेविकेला प्रसूती करावी लागली. मात्र उपचारासाठी नेत असताना नवजात बाळाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, निमड्या (ता. रावेर) येथील रुक्साना अजित तडवी (२४) यांची ही तिसरी प्रसूती होती. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना गारखेडा उपकेंद्रात आणण्यात आले. मात्र त्या वेळी तेथे परिचारिका किंवा वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. फक्त आशा सेविका उपलब्ध असल्याने तिनेच अत्यंत कठीण परिस्थितीत प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ रडत नसल्याने आई व नवजात बाळाला तातडीने पाल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेही…
आजचे राशिभविष्य दि.११ मार्च २०२६ मेष राशी हार्डवेअर व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात रस घेतील. आज वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. बदलीतील कोणत्याही अडचणी आज संपतील; तुमची तुमच्या पसंतीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी तुम्हाला मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला एका खास नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल. सी-टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कठोर परिश्रम सुरू ठेवावेत; यश मिळण्याची शक्यता आहे. किराणा व्यवसायात असलेल्यांना चांगला व्यवसाय दिसेल. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले कोणतेही मतभेद आज संपतील आणि घरात शांततापूर्ण वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या तक्रारी…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील जैन मंदिरासमोर असलेल्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला दि.१० मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या गोडाऊनमध्ये मंडपाचे साहित्य ठेवण्यात आले होते. आगीत परिसरात काही काळ धुराचे लोट पसरल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गोडाऊनचे ठिकाण पूर्वी भारत गॅस कंपनीच्या गॅस सिलिंडर साठवणासाठी वापरले जात असे. सध्या येथे मंडपाचे विविध साहित्य साठवून ठेवलेले होते. दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि परिसरातील नागरिक भीतीने हलक्यास हलकं झाले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बंटी शर्मा यांच्या घरासमोरच हे गोडाऊन असल्याने त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत, जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी…

