जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यासह १३ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (२३) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (२०), रा. कांचननगर यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सोमवार, २९ जानेवारी रोजी काढले.
आकाश सपकाळे व गणेश सोनवणे या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, मारामारी, मालमत्तेचे नुकसान यासह वेगवेगळे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत