Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्याचा तरुण हॉटेलात गेला प्रेयसीला भेटायला अन घडली नको ती घटना
    क्राईम

    पुण्याचा तरुण हॉटेलात गेला प्रेयसीला भेटायला अन घडली नको ती घटना

    editor deskBy editor deskFebruary 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असतांना गुन्हेगारी घटना सातत्याने प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबधातून खूनासारख्या घटना घडू लागल्या आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची आसाममधील गुवाहाटी शहरात हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संदीप याचा मृतदेह गुवाहाटी शहरातील तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी ५ फेब्रुवारी आढळून आला होता. याप्रकरणाचा तपास करताना गुवाहाटी पोलिसांनी तरुणीसह दोघांना अटक केली आहे. अंजली शॉ, विकासकुमार शॉ, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संदीप याची आरोपी अंजलीसोबत कोलकात्ता येथील विमानतळावर भेट झाली होती. कालांतराने त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. संदीपला भेटण्यासाठी आरोपी अंजली नेहमी पुण्यात येत होती.

    मृत संदीप देखील तिला भेटण्यासाठी गुवाहाटी येथे जात होता. यादरम्यान, संदीपने अंजलीला लग्नाची मागणी घातली. मात्र, संदीप विवाहित असल्याने अंजलीने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संदीपने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याचा राग मनात धरून अंजलीने संदीपचा काटा काढण्याचा प्लान आखला. तिने मित्राची मदत घेऊन संदीपला भेटण्यासाठी गुवाहाटी येथे बोलावले. तिथे एका हॉटेलात नेऊन संदीपला मिठाईतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर विकासच्या मदतीने त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026

    चिंचोलीत तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 22, 2026

    महिलेवर धारदार चाकूने वार ; तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.