Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक दिग्ग्ज्नानी  भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनानंतर रक्षा खडसेंनी आपली भूमिका बदलवत, आपण खडसेंना आवाहन केलेच नसल्याचे सांगत आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील डॉ.केतकी पाटील राष्ट्रवादीचे संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, एकनाथ खडसे हे देखील घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत.…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदायी आहे. कौटुंबिक समस्या आज सुटतील. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. काही धार्मिक कार्यक्रमाची आखणी करू शकता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील, तुमचा उत्साह वाढेल, पण पुढे जाण्यापूर्वी तुम्ही तुमचे अपूर्ण काम पूर्ण करा, अन्यथा कामाचा ताण वाढेल. हुशारीने वागा. आज गृहिणींचा घरामध्ये कामाचा ताण अचानक वाढेल, आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित कोणत्याही जुन्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुम्ही भावंडांशी बिघडलेले संबंध सुधारण्याचा विचार कराल. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता. रस्त्यावरून चालताना सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी झोपेतून उठून जात असतांना गच्चीवरून खाली पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शांताराम सुरवाडे वय ३० रा. करंजी पाचदेवळी ता. भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे नितीन सुरवाडे हा तरूण आपल्या आईवडील पत्नीआणि एक मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करून राहत्या घराच्या गच्चीवर जावून झोपला. रात्री ११ वाजता तो लघुशंकेसाठी खाली उतरत असतांना त्याचा तोल गेल्यानंतर गच्चीवरून…

Read More

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. आज जरांगे पाटील यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ गायक पंकज उदास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उदास यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने हिंदी संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंकज उधास यांना 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक…

Read More

जालना : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचाबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील…

Read More

भडगाव : प्रतिनिधी वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी कारवाई करत बेकायदेशीर वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत ५ डंपर, ५ ट्रॅक्टर, २ जेसीबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १० जणांविरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी व भडगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या ठिकाणावर मध्यरात्री छापा टाकला. याप्रकरणी संदीप मुरलीधर पाटील (४१, वडगाव सतीचे, ता. भडगाव), अक्षय देवीदास मालचे (२०), प्रवीण विजय मोरे (२०), मच्छिंद्र गिरधर ठाकरे (२१), ललित रामा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे पंकज राजेंद्र मराठे (३४, रा. कानळदा, ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. या अपघातात गोपाल वसंत पाटील (२९, रा. कानळदा, ता. जळगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कानळदा येथील पंकज मराठे हा तरुण जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. शनिवारी रात्री तो व त्याचा मित्र गोपाल पाटील दुचाकीने जळगाव येथून कानळदा येथे घरी जात होते. आव्हाणे गावाच्या पुढे गेल्यानंतर एका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू गोड सुपारीचा साठा केलेल्या गोदामावर कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने १४ लाख एक हजार ६१२ रुपयांचा साठा जप्त केला, ही कारवाई औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या दोन गोदामांमध्ये करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गोदाम मालक हिरालाल उत्तम पाटील (३८, रा. पिंप्राळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील गोदामात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाचे नाशिकचे सहायक आयुक्त एम. एम. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, अमित रासकर, गोपाल कासार, उमेश सूर्यवंशी…

Read More

धुळे : प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील एका निवासी शाळेमध्ये शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना २१ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १०, १३ आणि १४ वर्ष वयाच्या या मुली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात निवासी शाळा असून, त्यातील शिक्षकाने मध्यरात्रीच्या सुमारास तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणी एका विद्यार्थिनीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस स्टेशनला २४ फेब्रुवारी रोजी संबंधित शिक्षकाविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), (१) (आय), लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ८, अ.जा,…

Read More