जळगाव : प्रतिनिधी भरधाव रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघात झाल्याची घटना बुधवार दि. ६ रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जैन कंपनीसमोर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांवरील ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून प्रवाशी रिक्षा भरून जळगाव शहराकडे निघाली असतांना जैन कंपनीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप रामचंद्र पाटील (वय २८ रा. गढोदा ता. जळगाव), रिक्षा चालक दिपक भाई (वय ३३ रा. पाळधी ता. धरणगाव), प्रवाशी भगवानसिंह राजपूत (वय ४२ रा. जळगाव), विजय नामदेव महाजन (वय ३६ रा.…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील वटार शेतशिवारात मुख्य वीज वाहिनीवर काम करत असताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना अडावद-वटार शेतशिवारात घडली. ही घटना बुधवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील वटार शेतशिवारात मुख्य वीज वाहिनीवर काम सुरू असताना अचानक विजेच्या धक्क्याने दिलीप मोतीराम बारेला (२९, आडगाव, ता. चोपडा) या वायरमनचा मृत्यू झाला. सकाळी वीज कर्मचाऱ्यांसोबत मुख्य वाहिनीवर काम करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. यावेळी दिलीप यांना तत्काळ अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने चोपडा येथे हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी दोषीवर गुन्हा दाखल होईपर्यंत शवविच्छेदन होऊ…
पारोळा : प्रतिनिधी भर वस्तीत असलेल्या किसान महाविद्यालयाजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारमध्ये गॅस भरताना भीषण आग लागल्याने कार जळून खाक झाली. या घटनेत चालक भाजला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किसान कॉलेजसमोर साने गुरुजीनगर येथे रमेश भिवसन चौधरी (५५, पारोळा) हे घरगुती गॅस प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारमध्ये भरत होते. त्यावेळी शॉर्टसर्किट झाल्याने त्याचे आगीत रूपांतर होऊन गाडीमध्ये असलेल्या गॅसने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रुद्रावतार घेतला. आगीचे लोळ बाहेर पडू लागले. काही वेळातच कार जळून खाक झाली. अर्ध्या तासापर्यंत आगीचा थरार परिसरातील रहिवाशांनी अनुभवला. यात रमेश भिवसन चौधरी हे किरकोळ…
पाचोरा : प्रतिनिधी शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत रमेश शंकरलाल मोर (६५, रा. पाचोरा) यांची ३३ लाख ३० हजार १०० रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ५ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश मोर यांना जेसिका नामक व्यक्तीने १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधून एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगितले. या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते…
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग स्कूल (झेडआरटीसी) येथे लॉग बुकवर सही करण्यासाठी नऊ रुपयांची हजार लाच घेताना प्राचार्य सुरेश चंद्र व क्लर्क योगेश देशमुख या दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग स्कूल येथे अक्षय चौधरी यांनी ठेकेदारी पद्धतीने चारचाकी वाहन भाडेतत्त्वावर लावले आहे. त्यासंदर्भात लॉग बुकवर सही करण्यासाठी अकाउंटंट क्लर्क योगेश देशमुख यांच्याकडे गेले असता त्या मोबदल्यात देशमुख याने नऊ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम योगेश देशमुख याने स्वीकारून प्राचार्य सुरेश चंद्र यांना देताना दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पुणे येथील सीबीआय पथकाचे अधिकारी महेश चव्हाण यांना…
भडगाव : प्रतिनिधी दुचाकीसमोरुन बाजूला हो, असे बोलण्याचा राग येऊन भडगाव न शहरातील पारोळा चौफुलीवर कोठली (ता. भडगाव) येथील युवकावर भडगाव पेठ येथील एका तरुणाने ब्लेडने सपासप वार केले. मंगळवारी रात्री ८ 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. न याप्रकरणी भडगाव पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोठली येथील रहिवासी एकनाथ रवींद्र पाटील हा गावातीलच विशाल पाटील याच्यासोबत दुचाकीने वेल्डिंग दुकानाकडे येत असताना त्याने दुचाकीपुढे उभा असलेला रवींद्र संतोष जाधव (रा. भडगाव पेठ) यास दुचाकीसमोरून बाजूला होण्याबाबत सांगितले. याचा राग आल्याने संबंधिताने एकनाथ पाटीलच्या दुचाकीची चावी काढून घेतली. विशाल पाटीलने चावी मागितली असता रवींद्रन विशालची कॉलर…
मेष नातेसंबंधासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. घरात मन लागेल. घरच्या लोकांसोबत वेळ घालवाल. मित्रांसोबत फिरण्याचा प्लान कराल. मात्र, सहकाऱ्यांबाबत मनात शंका राहील. नवे मित्र जोडले जातील. कोर्ट कचेरीच्या कामात यश येईल. समस्या दूर होतील. मान सन्मान मिळेल. मित्र आणि नातेवाईकांमधील वितुष्ट दूर होईल. प्रवासाचा योग आहे. त्यामुळे थोडी दगदग वाढेल. पण एकूण आजचा दिवस आनंदी जाईल. वृषभ कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यास असमर्थ ठराल. त्यामुळे मतभेद निर्माण होतील. विवाहीत पुरुषांचं मन भलतीकडेच लागेल. त्यामुळे प्रेम संबंधात कटुता येईल. कुटुंबात जीवनसाथीची साथ मिळेल. आनंददायी बातमी ऐकायला मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. आत्मसन्मान कायम राहील. जोखीम पत्करण्याचं धाडस करा. व्यवसायात फायदा होईल.…
जळगाव : प्रतिनिधी पोलीस कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच नविन पोलीस स्टेशनचे बाधकाम करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमिकरणाला प्राथमिकता देण्यात आली असून इमारत, वाहने इत्यादीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून 28 कोटी एवढा निधी देण्यात आल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज सांगितले. पाळधी व रामानंद येथील नविन पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार राजू मामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , चाळीसगाव…
परभणी : वृत्तसंस्था राज्यातील हजारो विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून याचदरम्यान, परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परीक्षा केंद्रात खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात स्पर्धा परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना घडली होती. या परीक्षेचा पेपर लीक झाल्याने उमेदवारांना पुन्हा पेपर द्यावे लागत होते. आता असाच प्रकार बारावीच्या बोर्डाच्या पेपरमध्येही झाला आहे. परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. बोर्डाच्या प्रचंड खबरदारीनंतरही परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये बायोलॉजी पेपरचे प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
मुंबई : वृत्तसंस्था आगामी काळात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी आतापासून राज्य दौरे देखील सुरु केले आहे. यात भाजपच्या सर्व नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावर मोदी का परिवार असा उल्लेख केला आहे. यावर विरोधक टीका करत आहेत. आज ठाकरे गटाच्या मुख्यपत्रातून यावर भाष्य करण्यात आले आहे. मोदी परिवाराचा फुगा ! शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध करत हल्लाबोल करण्यात आला आहे. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. विरोधी पक्षांतील परिवारवादावर बोलणाऱ्या पंतप्रधानांना दुसऱ्यापक्षांमधील कुटुंबशाही भाजप परिवारात…

