नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणूक येत आहे. त्यापूर्वी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.” यापूर्वी रक्षाबंधनानिमित्त सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची (१४.२ किलो)…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जळके- एरंडोल रस्त्यावर रात्रीच्या सुमारास गावाजवळील वळणावर पहुर कसबे येथील सुरेश काशिनाथ चव्हाण २३वर्षीय युवक मोटारसायकल क्रमांक MH 04 AD 8975 ही रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून जागीच मृत्यू झाल्याचे सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांच्या लक्षात आले. जळके पोलीस पाटील संजय चिमणकारे यांनी अपघाताची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन जळगाव यांना कळविली घटनेची माहिती मिळताच पो.हे.कॉ.प्रदीप पाटील व स्वप्नील पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतास शवच्छेदनसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील नगरपालिके समोरील मोटर रिवाइंडिंगची चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून या दुकानांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांसह व्यापारी धास्तावले असून चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. धरणगावातील सचिन भागवत यांचे रेणुका मशनरी रिपेरिंगचे दुकान असून या दुकानातील २१ हजारांची ७० किलोची कॉपर तार २९ फेब्रुवारीला तर ९ हजारांची ३० किलो कॉपर तार ७ मार्चला चोरुन नेली होती. यात त्यांचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. तर राजेंद्र चोरी यांच्या हितेश इलेक्ट्रिकल दुकानातील १५ हजारांची ५० किलो कॉपर तार तसेच सत्तार खान पठाण यांच्या रॉयल इलेक्ट्रिक दुकानातील ७ हजार ५००…
यावल : प्रतिनिधी दहावीच्या इंग्रजी पेपरला झालेल्या कॉपीप्रकरणी जबाबदार धरत केंद्रप्रमुखांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर गुरुवारी दुपारी ही कारवाई झाली. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रप्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉकचे पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे आणि मुख्याध्यापक जी. एल. खान यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. गुरुवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. दरम्यान, या परीक्षा केंद्रावर फैजपूर येथील सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका ब्लॉकमधील विद्यार्थिनी कागद बाहेर फेकताना आढळून आली. तेव्हा त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आणि केंद्रप्रमुखासह चार जणांवर कारवाईचे आदेश दिले.…
मेष : तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. वृषभ : मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णाालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी केला आहे. यात तांबापूर येथून ३ संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य एका खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान २ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून असलेले खोलीचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी ठेकेदार आयुष्य मणियार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सरकारी…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याची घटना घडली आहे. या बालकाच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने या बालकाचा मृत्यू झाला. सुरुवातीला पाण्यात पडल्याने लहानग्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नंतर सीसीटीव्ही तपासला असता सदरील घटना निर्दशनात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला जात आहे. काही मुले हे सांडपाण्याच्या डबक्याजवळ खेळत असलेले सीसीटीव्हीमध्ये दिसते. काही वेळाने एका तेरा वर्षीय मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षाच्या…
धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील राजकारण आगामी लोक्साभेपुर्वी चांगलेच तापले असतांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर लागलीच शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील दौऱ्याला सुरुवात केली असून धाराशिव जिल्ह्यातल्या औसा येथील सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींसह शहांवर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे म्हणाले कि, अमित शहा शेपूट घाले गृहमंत्री आहेत. मणिपूर पेटले. तेव्हा तिकडे जायची हिंमत केली नाही. या नागोबाकडे काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसतोय. मात्र, या सगळ्या ठिकाणी त्यांनी शेपूट घातले. मात्र, महाराष्ट्रात येऊन ते आमच्यावर फणा काढतायत, असा शब्दा उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीकेची झोड उठवली. शिवसेनाप्रमुख होते म्हणून मोदींची…
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आज लोणावळ्यात पार पडतोय. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात, अशा शब्दात सज्जड दम दिला. नेमकं काय म्हणाले शरद पवार, “देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते. मुंबईतील भाषणात सांगितलं की पन्नास वर्षे शरद पवार बसलेत. मी त्यांचा आभारी आहे, पन्नास वर्षे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, हे अमित शाह यांनी मान्य केलं,असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत,…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होवू शकते त्यापूर्वीच सर्वच पक्षांनी मैदानावर जात उमेदवारांची चाचपणी सुरु असतांना नुकतेच महाविकास आघाडीची जागावाटपा संदर्भातील महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील हॉटेल फोर सिझन्स येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. बैठकीत जागावाटपाचा २०-२०-८ अशा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट २० जागा आणि काँग्रेस देखील २० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत…

