मुक्ताईनगर : वृत्तसंस्था श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला या परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मैल पायदळ चालून दिंड्यांसह लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येत असतात. त्यानिमित्ताने श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, मेहुण आणि चांगदेव येथे यात्रा उत्सव भरला जातो सध्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर चांगदेव येथे दाखल झालेले आहेत त्यामुळे टाळ मृदुंगाचा गजर आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष भजन कीर्तनात सर्व परिसर निनादुन गेला आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार…
Author: editor desk
लातूर : वृत्तसंस्था उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखूबाई तुळशीराम वाघमारे (५५) यांचा कोयत्याने खून केल्याची घटना २४ फेब्रुवारीला उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद होता. आरोपी हा मयत महिलेचा लहान मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले असून, आईच्या नावावरील अडीच एकर जमीन वाटून देत नसल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ तुळशीराम वाघमारे (३९) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याच्या कपाळावर खरचटलेली जखम दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी विचारले असता.पत्नीची बांगडी लागल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या पत्नीला विचारले असता, तिने असे काही घडले नसल्याचे सांगितले. त्यानंतर २९ फेब्रुवारीला नागनाथला ताब्यात घेतले असता, त्याने…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मेहुणबारे पोहरे येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून बकऱ्या चोरणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीची ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण दशरथ माळी (२२, रा. डामरुण, ता. चाळीसगाव), रोहन उर्फ माऊली ज्ञानेश्वर पवार (२३). राहल रामदास मोरे (२०, दोन्ही रा. पातोंडा, ता. चाळीसगाव), सौरव संतोष मोरे (२१, रा. सांगवी, ता. पाचोरा), दीपक प्रकाश सोनवणे (१९) आणि कपिल अशोक वाघ (२७, दोन्ही रा. पोहरे, ता. चाळीसगाव) यांचा समावेश आहे. पोहरे गावातील मनोज सोनवणे यांच्या गोठ्यातून डिसेंबर महिन्यात नऊ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या. याबाबत लक्ष्मण माळी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता…
भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळ तापी पुलाच्या अलीकडे मिस्तरी कामासाठी आलेल्या गोजोऱ्याच्या युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश अशोक सोनवणे हा तरुण तापीनगरात कामाला जात असताना यावल रोडवरील गोदामाजवळ गाडीतून धूर निघू लागल्याने त्याने वाहन थांबवले व धुराची पाहणी करीत असताना दुचाकीने पेट घेतला. हे पाहून या तरुणाने रस्त्याच्या कडेला धाव घेतली, तर दुचाकीने पेट घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार सुपडू पाटील व संजय ढाकणे यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अग्निशमन केंदाच्या बंबाला पाचारण करण्यात आले व आग…
भुसावळ : प्रतिनिधी तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये कुन्हा या गावी एका शेताच्या बाजूला कोंबड्यांच्या झुंजी लावून सट्टा खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंमलदार सूरज पाटील यांनी हा प्रकार सुरु असल्याबाबतची माहिती डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांना दिल्यानंतर ८ रोजी यानुसार हा छापा टाकला. यावेळी कुन्हा शिवारात रईस बागवान यांच्या लिंबूच्या मळ्याशेजारी असलेल्या परिसरात झुडुपांमध्ये १५ ते १६ इसम हे कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर पैशांचा हार- जितचा खेळ खेळताना दिसून आले. यावेळी २००० किमतीचे २ फायटर कोंबडे, ३,६०० रुपये रोख, ६००० किमतीचे ६ मोबाइल फोन व ५,७५,००० किमतीच्या एकूण १४ मोटरसायकली असा एकूण ५,८६,६००चा मुद्देमाल…
मेष आज तुम्हाला आर्थिक चढ-उतार जाणवू शकतील. आज तुम्ही तुमच्या क्षमतेने काम सहज पूर्ण कराल. काही लोक तुमच्यासाठी खास ठरतील . आणि काही महत्त्वाच्या कामात तुम्हाला मित्रांचे सहकार्यही मिळू शकते. स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नशिबाची साथही मिळेल. वृषभ आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही नवीन संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांना राजकारणात यश मिळू शकते. आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू देखील मिळू शकते. आरोग्य तंदुरुस्त राहील. आज तुमची सर्व प्रलंबित आणि महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मिथुन आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. कोणत्याही कामात तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितकं काम चांगलं होईल.…
मलकापूर : वृत्तसंस्था आयशर -ट्रकच्या भिषण अपघातात तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर तालसवाडा फाट्यानजीक ८ मार्च शुक्रवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर क्र.एम.एच.१९/सी.एक्स. ०९७७ हि पाचोर्याची गाडी भुसावळ वरून अकोल्याकडे निघाली होती. राष्ट्रीय महामार्गावर तालसवाडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या ट्रक क्र.एम.पी.१४/एच.सी.३७८६ या वाहनाची समोरासमोर भिषण धडक झाली. हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरशः चुराडा झाला. आयशर वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे (३२ रा.पतखडी (बेलदार वाडी) जळगांव खान्देश व ट्रकचालक रघुवीर सिंह (३९ पाटणीया) मध्यप्रदेश हे दोघे जागीच ठार झाले. तर…
जळगाव : प्रतिनिधी जागतीक महिला दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन महिला दिन सप्ताह साजरा केला जात आहे. दि. ८ मार्च शुक्रवार रोजी सकाळी १० वा. शहर वाहतुक शाखा, जळगाव येथुन महिलांसांठी ३ किमी मोटर सायकल हेल्मेट रॅलीचे शहर वाहतुक शाखा कार्यालय पासुन कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक मार्गे शहर वाहतुक शाखा कार्यालय येथपर्यंत हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी/अंमलदार, पोलीस कुटुंबिय व जळगाव शहरातील महिला वेगवेगळा पारंपारीक वेशभुषा करुन सहभाग नोंदविला. स्पर्धेला मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात केली. सदर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी तुकाराम परिसरातून लोखंडी तलवारसह रात्री ११ वाजता हनुमान मंदिर परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन उर्फ टिचकूल कैलास चौधरी रा. हनुमान नगर, तुकाराम वाडी जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सचिन टिचकून कैलास चौधरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २ असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावरती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान हद्दपार असताना देखील तो जळगाव शहरातील…
पुणे : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्य़ेला पुण्यातील जीएसटी कार्यालयातील एका महिला अधिका-यास लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे जीएसटी कार्यालयात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मालती रमेश कठाळे हिच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात कठाळे यांच्या विराेधात तक्रार दिली हाेती. व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता. त्यासाठी व्यावसायिकाने अडीच हजार रुपये फी भरली होती. हे प्रकरण वर्ग-२ अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होते. कठाळे यांनी व्यावसायिकास कार्यालयात समक्ष बोलावून जीएसटी क्रमांकांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी…

