Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून हद्दपार असतानाही सुरा घेऊन फिरणाऱ्या आशुतोष उर्फ आशू सुरेश मोरे (२३, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आशुतोष मोरे याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. तो रामेश्वर कॉलनी परिसरात सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, साई मुंढे यांनी ८ रोजी रात्री मेहरुण तलाव जवळील बांधाजवळून आशुतोषला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक लोखंडी सुरा सापडला. पोलिसांनी तो जप्त केला.

Read More

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाळा येथील शेतमजूर महिलांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली, या अपघातात नऊ महिला जखमी झाल्या. त्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. चार महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळा येथील शेतमजूर महिला तालुक्यातील शेवगा, चिखली येथे हरभरा काढणीसाठी गेल्या होत्या. या महिला दुपारी रिक्षा क्रमांक एम. एच.३०, एल. १३५५ ने परतत होत्या. त्यावेळी नाडगाव रस्त्यावर खासगी हॉस्पिटलजवळ दुपारी तीन वाजता रिक्षाचालक अजय शिवाजी सोनवणे (रा. माळेगाव) याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा दोन वेळा उलटली. यात क्षमतेपेक्षा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. फैजपूरच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांच्या खासगी वाहनाला डंपरची धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केला. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११:३० वाजता हिंगोणा शिवारातील पेट्रोल पंपासमोर घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालकास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सुरेश कोळी (३०, रा. डांभुर्णी, ता. यावल), असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. यावल रोडवर अवैध वाळ वाहतक होत असल्याची माहिती अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली. यानंतर त्यांच्या पथकाने यावलहून फैजपूरकडे जाणाऱ्या वाळू इंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपर भरधाव वेगाने पुढे गेला. यानंतर पोलिस…

Read More

मेष आजचा तुमचा दिवस उत्तम जाईल. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य आज तंदुरुस्त राहील. या राशीच्या अविवाहित महिलांना आज चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी विशेष संवाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाची परिस्थिती राहील. वृषभ आज कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आज ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास पाहून बॉस तुमच्यावर खूश होतील. तुम्हाला काही चांगली बातमीही मिळू शकेल. पूर्वी केलेल्या कामाचे चांगले परिणाम होतील. आज तुम्हाला एखाद्या कामात मित्राची विशेष मदत मिळेल. अचानक आर्थिक लाभ होईल. मिथुन अनेक दिवसांपासून तुमच्या प्रगतीत आलेले अडथळे आज दूर होतील. अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण…

Read More

धरणगाव – प्रतिनिधी धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथिल बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी भव्य दिव्य उपजिल्हा रूग्णालय उभारले जावे यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून पालकमंत्री एवढ्यावरच न थांबता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामाच्या 40 कोटीच्याअंदाजपत्रकास व आराखड्यानां मान्यता मिळाली आहे. या उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यतेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी केली होती. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार हे निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही,…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष नव्हे तर निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी असल्याची तिखट टीका त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर केली आहे. महाराष्ट्रात केवळ तीनच पक्षांची स्थापना झाली. यात जनसंघ, शिवसेना व महाराष्ट्र निर्वाण सेनेचा समावेश आहे, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी मनसेला कोणत्याही स्थितीत यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात केवळ तीनच पक्ष निर्माण झाल्याचे नमूद करत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात पक्षच नसल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही. ती निवडून येणाऱ्या लोकाची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आतापर्यंत हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी तेच निवडून…

Read More

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील आक्रमक असतांना सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे. राज्य सरकारने मराठा…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना घडत आहे. आता नुकतेच एका अधिकाऱ्याने जीवन संपविल्याची माहिती समोर येत आहे. सुभाष दुधाळ असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले. रात्री घटना केव्हा घडली याबाबत माहित नसून सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला आहे. परळी येथील घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गेल्या महिनाभरात तीन अधिकाऱ्यांनी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर पोलीस ठाण्यात शनिवारी दि. ९ मार्च रोजी सकाळी एका संशयीत आरोपीने पोलीस कोठडीतील शौचालयात गळफास घेत असतांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी यांनी धाव घेतली. यामुळे खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी असलेल्या संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (वय ४९) असे मयताचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील मारवड पो.स्टे.ला दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत यास दि.२ मार्च रोजी ९.४१ वाजता अटक केली होती. गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस…

Read More