चोपडा : प्रतिनिधी सातपुडा जंगलात गावठी पिस्तुलांची तस्करी करताना चार जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ९ गावठी पिस्तुले व २० जिवंत काडतुसांसह चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास कृष्णापूर गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींची पोलिसांशी झटापटही झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरजनसिंग प्रकाशसिंग चावला ( २०), मनमितसिंग धृवासिंग बर्नाला (२०, रा. पारउमर्टी ता. वरला, जिल्हा बडवाणी), अलबास दाऊद पिंजारी (२७, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) आणि अर्जुन तिलकराज मलिक (२५, रा. अमृतसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांना कृष्णापूर ते उमर्टी या दरम्यान सातपुडा डोंगराळ भागात पकडण्यात आले. त्यावेळी चारही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी शहरातील दिल्ली दरवाजा येथील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८:३०च्या सुमारास दिल्ली दरवाजाजवळ राहात असलेली नम्रता भास्कर फासगे (१६) ही पारोळा येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. सध्या ती परीक्षा देत होती. या युवतीने घरात कोणालाच काहीही न सांगता आपल्या घरातील लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास तयार करून आत्महत्या केली. परिसरात ही घटना कळताच तिला खाली उतरवून कुटीर रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका निरमुळे यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर : प्रतिनिधी शहरातील आठवडी बाजारात दुचाकी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कागदपत्रे मागितल्यानंतर त्याच्याकडे मिळून आली नाहीत. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आधीची चोरलेली दुचाकीही काढून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव सायला मानसिंग बारेला (१८) रा. खाऱ्या काकोडा, ता. झिरण्या जि. खरगोन मध्य प्रदेश ह. मू गिट्टी मशीन खदान, उटखेडा रोड, ता. रावेर) असे आहे. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने शहरासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. बाजारातून मोबाइल, इतर वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दुचाकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शुक्रवारी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खडका रोड भागात तीन वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली. घटनेमुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या बालकाचा शोध लागला. मिळालेल्या माहितीनुसार, रसलान उर्फ बाब बिहारी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडिल नसरुद्दीन हे खडका रोड येथे मुजम्मिल खान यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास आहे. वरच्या बाजूस घर आणि खाली दुकान आहे. रविवारी सकाळी ११ वाजता देखील तो वडिलांसोबत आला. खडका रोडवरील बिलाल कांडप मशिन या दुकानाबाहेर खेळत होता. याच ठिकाणी ३० फूट खोल व सहा फूट रुंद नाला आहे. अरसलाम हा खेळता खेळता…
धुळे : वृत्तसंस्था काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवार, १२ मार्च रोजी गुजरातमधून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वतः खासदार गांधी हे थेट हेलिकॉप्टरने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता नंदुरबारात दाखल होतील. तेथून ते सी.बी.मैदानावरील सभास्थानी जाणार आहेत. नंदुरबारच्या सभेनंतर दुपारी ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचाकडे रवाना होणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे केंद्रीय व राज्य नेते नंदुरबारात दाखल झाले आहेत. राहुल गांधी हे सुरत येथून हेलिकॉप्टरने नंदुरबारात दाखल झाल्यानंतर त्यांचा ‘रोड शो’ करायचा किंवा कसा, याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. मंगळवारी साधारणतः दोन वाजता यात्रा व नेते मंडळी ही दोंडाईचाकडे प्रस्थान करतील, अशी माहिती आमदार…
मेष दिवसाची सुरुवात उत्तम राहील. तुम्ही लोकांशी संपर्क साधाल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. घरातील काही शुभ कार्यही पूर्ण होतील. यावेळी लोककल्याणाच्या कामाकडे तुमचा कल वाढेल. वृषभ रखडलेल्या कामांना गती मिळेल. आपला हेतू साध्य करण्यासाठी थोडेसे स्वार्थी असणे आवश्यक आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतीही खरेदी-विक्री योजना आखली जात असेल, तर ती अंमलात आणण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे. कुटुंबात आणि समाजात योग्य मान-सन्मान मिळेल. मिथुन मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्रीच्या बाबतीत यश मिळेल. व्यावहारिक विचार ठेवल्यास कोणताही निर्णय घेण्यास मदत होईल. प्रिय मित्राचे घरी आगमन होईल आणि कुटुंबासोबत मनोरंजक सहलीचीही शक्यता आहे. कर्क स्वभावाने भावनिक असणे आणि इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे हा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले. मनपाच्या ७ बंबानी ही आग आटोक्यात आणली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा रा. शिवधाम मंदीर, जळगाव याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देव्हारा , खुर्ची, कपाट आदि साहित्य बनविले जाते. दुकानाच्या बाजूला देवकिरण विलास पाटील रा. निवृत्ती नगर, जळगाव याचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवारी १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता फर्निचर दुकानाला…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सीएम निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाहीर प्रवेश सोहळा रात्री 8 वाजता पार पडणार आहे. रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतयांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन, रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही संजय राऊतांनी…
जळगाव : प्रतिनिधी तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील अशोक नगर परिसरातील रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपासून तो कुठ्ल्यातरी तणावात असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शितल…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताची मालिका सुरु असतांना दि.६ मार्च रोजी जळगावकडून शिरसोलीकडे जात असलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने चंद्रकांत शंकर बोरनारे (४९, रा. रामेश्वर कॉलनी) हे जखमी झाले, ही घटना ६ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास रायसोनी महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेले चंद्रकांत बोरनारे हे ६ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या दुचाकीने (एमएच १९-डीपी ५४२९) जळगावकडून शिरसोलीकडे जात होते. रायसोनी महाविद्यालयासमोर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने (एमएच १९-बीवाय २७२०) बोरनारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बोरनारे हे…

