जळगाव : प्रतिनिधी खेडी परिसरातील बसथांब्याजवळ हातात लोखंडी सुरा घेऊन, दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या आहेत. कमलेश प्रकाश सपकाळे (वय २१, रा. हरिओमनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास कमलेश सपकाळे हा खेडी परिसरातील बसथांब्याजवळ हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कमलेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, विजय कोळी, साई मुंडे यांनी ही कारवाई केली.
Author: editor desk
बोदवड : प्रतिनिधी सोशल मीडिया हे प्रसार- प्रचार करण्याचे तसेच प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे जलद साधन आहे. परंतु हे साधन काही वेळेस नुकसानदायी देखील ठरत आहे. येथील एका महिलेचे खाते हॅक करून अश्लील पोस्ट यामार्फत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका मध्यमवर्गीय महिलेचे सोशल मीडियावर खाते आहे. हे खाते एकाने हॅक करत त्यावर अश्लील संदेश व पोस्ट टाकली आणि याच महिलेच्या नावाने मित्र जोडण्याचे संदेश प्रसारित होऊ लागले. ही बाब या महिलेच्या लक्षात आली असता, तिने याबाबत सायबर सेल गुन्हे शाखा जळगावकडे तक्रार नोंदवली आहे. यानंतर हे खाते बंद करण्यात आले आहे. मात्र यामुळे नाहक या महिलेला त्रास…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथे मीटर बसविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वायरमन अमीन शहा (वय २९, रा. वरणगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी वायरमन शहा याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसविण्यासाठी वरणगाव कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता. डिमांड नोट भरली, तरीही वीज मीटर बसविण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. मंगळवारी एक हजार रुपयांवर तडजोड केली. या लाचेची रक्कम स्विकारत असताना वायरमनला संशय आला आणि त्याने तक्रारदारच्या गळ्यातील व्हाइस रेकॉर्डर हिसकावून घेतला आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी वायरमन याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल…
मेष : हृदयरोग असणाऱ्यांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. शिशिर ऋतुतील पानगळी प्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. वृषभ : आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील सातगाव तांडा येथील तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील सातगाव तांडा येथे २२ वर्षीय तरुण पोपट ओमकार राठोड हा तरुण आपल्या तर परिवारासह वास्तव्याला होता. रविवार १० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा राहुल अभिमान अल्हाड वय-२५ याने गावातील बसस्थानक जवळ शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केली आणि जमिनीवर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर गावात खळबळ उडाली.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपुर येथून समोर आली आहे. प्रेमामध्ये आडथळा ठरणाऱ्या सासुला तिच्याच सुनेने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तब्बल ८०० सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हत्येचा तपास करण्यात यश आले आहे. सध्या या हत्येच्या बातमीनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपुकमधील बोरानाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. जिथे (ता.७)मार्च रोजी पीडित महिला संतोष कंवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये आरोपीने सासूचा गळा दाबून तब्बल ५ वेळा…
पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे. दरम्यान, मध्यरात्रीच वसंत मोरे यांनी भावनिक पोस्ट केली होती. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांनतर आज दुपारी थेट वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील पत्रही त्यांनी पोस्ट केले आहे.…
हिंगोली : वृत्तसंस्था लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या. अन्यथा, कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार आणि निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के स्वतंत्र आरक्षण हे फसवं असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. मराठा समाजाला मिळालेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. त्यामुळे सरकारने सगेसोयरे…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होत असतांना आज देखील राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीने उमेदवार जाहीर केले नाही तर दुसरीकडे महायुतीत असलेल्या भाजपच्या हायकमांडने शिंदें शिवसेनेच्या १२ पैकी ६ खासदारांचे तिकीट कापून नवे उमेदवार द्यावेत, या अटीवर भाजप ठाम आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे कोडे सोडवण्यासाठी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. त्यातमहाराष्ट्रात ३० पेक्षा एकही जागा कमी घ्यायची नाही, असा पुनरुच्चार भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केला. शिंदेसेनेला १२ व अजितदादा गटाला ६ जागा दिल्या जातील. आतापर्यंत भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला होता. मात्र त्याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही असा पवित्रा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), 2019 देशभरात लागू करण्यात आला आहे. यासंबंधीचे नियम आज अधिसूचित करण्यात आले. CAA पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देणार आहे. CAA नियम जारी केल्यानंतर, आता केंद्र सरकार 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या अत्याचारित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करेल.डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मंजूर झाल्यानंतर, या कायद्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकली नाही, कारण त्याच्या अंमलबजावणीचे नियम अधिसूचित होणे बाकी होते, परंतु आता मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होणार असून, या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू होणार…

