Author: editor desk

सोलापूर : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘शकुनी मामा’ अशी उपमा देत, महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप खोत यांनी केला. सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खोत म्हणाले, जयंत पाटील यांच्या पांढऱ्या चेहऱ्यामागे ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारी दडलेली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राजकीय सूडबुद्धीने कारवाया करण्याचे प्रयत्न झाले, असा दावा त्यांनी केला. बागणी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचा संदर्भ देताना खोत म्हणाले,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहर परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तनवीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय ३०, रा. गेंदालाल मिल) या तडीपाराला जळगाव शहर पोलिसांनी बुधवार, १० फेब्रुवारी रोजी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल भागातील साईबाबा मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. कानळदा रोडवर एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस कर्मचारी अमोल अशोक ठाकूर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी तनवीर याला उपविभागीय दंडाधिकारी जळगाव विभाग यांनी ७ फेब्रुवारी…

Read More

बोदवड : प्रतिनिधी ऑनलाइन कर्ज अॅपवरून कर्ज घेणे शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही पुन्हा हप्ता भरण्याची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित अॅपच्या हॅकरने त्या कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सदाशिव तायडे (वय ४०) हे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गत आठवड्यात एका ऑनलाइन अॅपवरून सुमारे साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ई-मेल व संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती अॅपवर अपलोड केली. हे कर्ज त्यांनी आठ दिवसांत पूर्णपणे फेडले. मात्र,…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रजा टॉवर चौकात गुरुवारी दुपारी किरकोळ वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगा आणि एक तरुण गंभीर जखमी झाले असून, मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रजा टॉवर चौकात एका १३ वर्षीय मुलगा आणि एका तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाने अचानक उग्र रूप धारण केले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी अज्ञात व्यक्तीने संतापाच्या भरात तेरा वर्षीय मुलाच्या डाव्या कानाजवळ चाकूने जोरदार वार केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१३ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या सामाजिक सुधारणांसाठी तुमचे शेजारी तुमची प्रशंसा करू शकतात आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या रूपात नवीन पाहुण्यांचे आगमन तुमच्या घरात आनंदाचे वातावरण आणेल. या राशीखाली जन्मलेल्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. जोडीदारसोबत बाहेर जेवायला जायचा प्लान ठरेल. वृषभ राशी कलांमध्ये रस असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. एखादी मोठी संस्था तुमची कला लोकांसमोर सादर करू शकता. यामुळे तुम्हाला खूप प्रशंसा मिळू शकते. आज तुमच्या व्यवसायात चांगल्या ऑफर मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. मिथुन राशी आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही बालपणीच्या मित्रासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. सरकारी कार्यालयात…

Read More

मुंबई :  वृत्तसंस्था अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत मनातील भावना व्यक्त केल्या. “आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. सुळे यांनी सांगितले की, शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. “घरात एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत,” असे म्हणत त्यांनी कुटुंबातील भावनिक स्थिती स्पष्ट केली. अजित पवार यांच्या आठवणी अजूनही ताज्या असून त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते रोहित पवार यांनी गुरुवारी महत्त्वाच्या विधानांचा ऐलावा दिला. त्यांनी सांगितले की, नरेश अरोरांना कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवा, अशी काहींची भूमिका होती; मात्र अजित पवार यांच्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भातील भूमिका वेगळी होती. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कुठेही खोटं बोललेले नाही. त्यांनी दादांच्या अपघातावरही चिंता व्यक्त केली. “गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवर आणि राज्यपातळीवर लोक त्यांच्यासोबत नव्हते, फक्त काही मोजके आमदार दादांसोबत होते. हा अपघात आहे की घातपात? हाच एक महत्वाचा मुद्दा आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएसोबत सहभाग होणार का, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे पुढे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या निर्णयानुसार, आता बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए परवानगी मानले जाणार असून जमीन रुपांतर प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा बदल लागू केला आहे. या सुधारित तरतुदीनुसार अकृषक कर आकारणीची पद्धत पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. यापुढे जमीन मालकांना फक्त एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ भरावे लागेल. संबंधित रक्कम भरल्यानंतर जमीन अकृषक वापरासाठी रुपांतरित करता येणार आहे. तसेच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ऑनलाइन पार्टटाइम कामाच्या आणि ‘मर्चट टास्क’ पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पाचोरा येथील एका उच्चशिक्षित महिलेला तब्बल ८ लाख ५० हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा येथील रहिवासी कीर्ती दिलीप येवले (वय ३२) या खासगी नोकरी करतात. ८ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान, ‘अरोकीया जेनीता’ नावाच्या एका महिलेने, जी स्वतःला एनएसई च्या प्रशासक विभागात कार्यरत असल्याचे सांगत होती, तिने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कीर्ती यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर टेलिग्रामवरील ‘ऐंजलिया’ नावाच्या अॅडव्हायजरने त्यांना एनएसई मर्चट टास्क’ पूर्ण केल्यास मोठ्या फायद्याचे आमिष दाखवले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  लग्नासाठी पाळधी येथे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिलेचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील बारी वाडा भागातील रहिवासी सुनीता अशोक बारी (वय ५२) या १० फेब्रुवारी रोजी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या बसने पाळधी (पहूर) येथे लग्नासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान चोरट्यांनी सुनीता बारी यांच्याजवळील कापडी पिशवी धारदार वस्तूने कापली. पिशवीत ठेवलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (पेंडंटसह) आणि ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, असा एकूण ३८ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सुनीता बारी यांच्या तक्रारीवरून…

Read More