जळगाव : प्रतिनिधी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. हवामान…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री शिवारात दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात छत्रपती संभाजी नगर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या माळी वाडड्यातील चालक लक्ष्मण मन्साराम महाजन (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पिंप्री ते चिंचपुरा दरम्यान वळण रस्त्यावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील जैनोहीन कॉलनीतील दादाराव बाबूराव अहिरे याने आपल्या ताब्यातील अशोक लेलन्ड कंपनीची गाडी (एमएच- २०, ईएल- ७११८) ने भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या महेंद्रा पीकअप गाडी (एमएच- १९, बीएम- ३४५९) ला समोरुन जबर धडक दिली.…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे अंगाचा थरकाप उडवणारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली शुक्रवारी (दि. १२) या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून, देऊळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी विवाह झाला होता. पतीला सुरुवातीला मद्याचे व्यसन असल्याने छोटी-मोठी कुरबुर व्हायची. परंतु, गेल्या काही काळात विशालने प्रतिभाचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. दोन…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीला कूलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षदा किशोर मोरे (१२) असे मयत मुलीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, अक्षदाचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवते. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कूलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील सातपुडा भागात पोलिसांसह वनविभागाच्या पथकाने ५ वटवाघळांची तस्करी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मध्य प्रदेशातील असून त्याची व्हॅनही जप्त करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भारसिंग ग्यानसिंग बारेला (गुलझिरी, पो. पाडल्या बोरवाल, जि. खरगोन) असे या आरोपीचे नाव आहे. एम.पी.०९-बीसी-४९३८ या व्हॅनने तो पाच जिवंत वटवाघळांची तस्करी करीत होता. तशातच वैजापूर वनविभागाचे व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना त्यांच्या नजरेस व्हॅन पडली. त्यांनी व्हॅन रोखली. तपासणी केल्यावर वाहनामध्ये पाच जिवंत वटवाघूळ आढळून आले. या पथकाने वटवाघळांसह वाहन ताब्यात घेतले आणि आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी, आता वंचित बहूजन आघाडीकडून देखील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. रावेरमधून संजय ब्राम्हणे यांच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. आता जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुल्लकुमार लोढा यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. काही वाद असतील तर तेही सोडवले जातील. तुमचा सल्ला व्यवसायात प्रभावी ठरेल. तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांकडून काही मदत मागितली तर ती तुम्हाला सहज मिळेल. तुमच्या मुलाला नवीन नोकरी मिळाल्याने वातावरण आनंदी राहील. तुम्हाला एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वृषभ आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. जास्त कामामुळे तुम्हाला शारीरिक थकवा, अशक्तपणा येऊ शकतो. कुटुंबातील लोक तुमच्या कामावर खूश होतील. तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकते.…
पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे 65 लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. आचारसंहिता काळात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ 8एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून 13 लाख 90 हजाराच्या 500रुपयांच्या नोटा…
पुणे : वृत्तसंस्था अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर आता राज ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेश देखील दिला होता. यामुळे आता महायुतीची ताकद वाढली असून राज ठाकरे यांचे फोटो लावून महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे. शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. यात ठाकरे गटाने थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले असा हल्लाबोल ठाकरे गटाने मुखपत्रातून केला आहे. तसेच हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. शिवाय अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीसांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत असेही म्हणत आज ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांच्यावर…

