भुसावळ : प्रतिनिधी येथील आगाखान वाड परिसरात उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोन आली आहे. या घटनेत फिर्यादी तरुण, त्याची पर्न व वडील गंभीर जखमी झाले असून बाजारपेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख हसिक उर्फ मुन्ना (वय २८) यांनी जमिना रउफ कुरेश हिच्याकडून ४ हजार रुपये उसने घेतले होते आरोपींनी पैसे परत मागितले असता, शाहरुख यांनी पैसे परत केल्याचे सांगितले. यावरून वाव निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने संशयित रहिम् रउफ कुरेशी व जमिना रउफ कुरेशी यांनी शाहरुख यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी चोरी केल्याच्या संशयावरुन अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय १९) याला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व लोखंडी आसारीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहराील उस्मानिया पार्कमध्ये हम्मीद अब्बास खाटीक हे वास्तव्यास असून त्यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या खाटीक याने चोरी केल्याचा संशयावरुन दि. २४ रोजी संशयित सुपड्या, पंकज आणि किरण सपकाळे या तिघांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व लोखंडी आसारीने उजव्या पायाच्या मांडीवर आणि कंबरेला मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमीच्या…
भुसावळ : प्रतिनिधी कंपनीत जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन श्रीकांत सुरेश पवार (२८, रा. कुहे पानाचे, ता. भुसावळ) या कामगाराचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला मित्र आणि दुसऱ्या दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात २४ मार्च रोजी रात्री चिंचोली गावाजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे येथील श्रीकांत पवार हे एका पाइप कंपनीत कामाला होते. २४ मार्च रोजी ते मित्राला सोबत घेऊन कंपनीत जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी श्रीकांत पवार यांना मयत घोषित केले. श्रीकांत यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच, कुटुंबीय व ग्रामस्थ रुग्णालयात…
आजचे राशिभविष्य २६ मार्च २०२६ मेष राशी दणदणीत यश मिळणार, मेहनतीचा सगळ थकवा दूर होईल. तुमच्या मेहनतीमुळे लोक प्रभावित होतील. मालमत्तेसंबंधीची कामे आज पूर्ण होतील. टीकाकार गप्प होतील. घरात एक आध्यात्मिक आणि सकारात्मक वातावरण राहील. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करण्याकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल आणि समाजात तुमचा आदर केला जाईल. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि मनोबलाने नवीन टप्पे गाठाल. नातेवाईकांच्या आगमनाने तुमच्या घरात एक सुखद वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कराल. मिथुन राशी आज तुमच्यावर बरीच जबाबदारी असेल, पण तुम्ही योग्य व्यवस्था…
मुंबई : वृत्तसंस्था भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक वळण आले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अशोक खरातने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती,” असा खळबळजनक दावा पडळकर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पडळकर म्हणाले की, जयंत पाटील हे आपल्या मुलासह अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिरात गेले होते. “त्यांना कोणाच्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली, हे समोर आले पाहिजे. पोलिसांना नरबळीचा संशय आहे. त्यामुळे त्या रक्ताचे सत्य उघड झाले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विचारसरणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “स्वतःला पुरोगामी…
मुंबई : वृत्तसंस्था भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “अशोक खरातसारखा अघोरी आणि विकृत माणूस पुन्हा कधीही जेलबाहेर येऊ नये, याची खात्री प्रशासनाने करावी,” असा इशारा त्यांनी दिला आहे. राजकीय हस्तक्षेप करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दमानिया यांनी या प्रकरणामागे मोठे संगनमत असल्याचा आरोप करत म्हटले की, “हे सगळे काही एकटा माणूस करू शकत नाही. त्यामागे सहकारी आणि प्रभावशाली लोकांचा हात आहे.” त्यांनी राज्यातील विविध सरकारांवरही निशाणा साधत, मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो; मात्र शाळा, रुग्णालये आणि मूलभूत सुविधांसाठी निधी दिला जात नाही,…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव-भुसावळ महामार्गावरील साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे करण्यात आलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेत कथित हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी कुटुंबीयांनी नशिराबाद पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. मृत तरुणाचे नाव स्वप्नील रोहिदास बनसोडे असे आहे. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नीलला फेब्रुवारी महिन्यात कमरेच्या वेदनांचा त्रास होत असल्याने त्याने गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मणक्याची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले आणि ९ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर स्वप्नीलला घरी पाठवण्यात आले. मात्र काही दिवसांतच शस्त्रक्रियेच्या जागी सूज येऊन पू (पस) साचल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याचा भाऊ शुभमने त्याला पुन्हा…
मुंबई : वृत्तसंस्था महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी नाव जोडले गेल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वतःवरील आरोप फेटाळून लावत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, “मला बदनाम करण्याचा कट भाजपच्या कार्यालयातून राबवला जात आहे,” असा दावा त्यांनी केला. अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये खरात कडू यांच्या कानात काहीतरी सांगताना तसेच “तुम्ही भाजपमध्ये मंत्री असताना इथे या” असे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर कडू यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कडू…
जळगाव : प्रतिनिधी कंपनीत जात असतांना दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात श्रीकांत सुरेश पवार (वय २८, रा. कुऱ्हपानाचे, ता. भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत आणि धडक देणाऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता चिंचोली आणि उमाळा गावादरम्यान असलेल्या टेकडीजवळ घडली. जखमींवर खासगी रुगलयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हपानाचे गावात राहणारा श्रीकांत पवार हा तरुण उमाळा येथील एका पाईप कंपनीत कामाला होता. मंगळवार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी तो मित्राला सोबत घेवून कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाला. कंपनीत जात असतांना चिंचोली ते उमाळा गावाच्या मध्ये असलेल्या टेकडीजवळ समोरुन…
जळगाव : प्रतिनिधी इन्सटाग्रामवर झालेल्या मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये घेवून जात तिच्यासोबत शारिरीक संबंधाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. तसेच सोबत काढलेले फोटो वेगवेगळ्या आयडीवरुन तरुणीला पाठवून तिची बदनामी केली. ही घटना दि. १० सप्टेंबर ते दि. १० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित रोहीत आनंदा राठोड (रा. उजनी, ता. औसा, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून इनस्टाग्रावरुन तीची ओळख संशयित रोहीत राठोड याच्यासोबत झाली. मैत्रीचा फायदा घेत संशयिताने मुलीला दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी भुसावळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल प्रिन्स येथे नेले. तेथे तरुणीकडे त्याने शरिरसुखाची मागणी केली…

