Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अॅपच्या माध्यमातून महिलेची २ लाखांची फसवणूक
    क्राईम

    अॅपच्या माध्यमातून महिलेची २ लाखांची फसवणूक

    editor deskBy editor deskJune 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील बीपीसी बैंक कॉलनीत महिलेला एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एका अॅपच्या माध्यमातून एकूण २ लाख २९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना ९ जून रोजी दुपारी दीड वाजता घडली होती. भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बीपीसी बैंक कॉलनी शुभांगी सिद्धेश पाटील (५६) या ९ जून रोजी दुपारी दीड वाजता त्यांना एका मोबाइल नंबरवरून फोन आला. त्यावर त्यांनी सांगितले की, आपण एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत आहे, तुम्हाला तुमचे परत पैसे मिळण्यासाठी एक अँप पाठवत आहे, ते डाऊनलोड करून त्यात डिटेल भरा असे, सांगितले. त्यावर शुभांगी पाटील यांनी विश्वास ठेवून संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून २ लाख २९ हजार रुपये काढून त्यांची ऑनलाइन फसवणूक केली. याबाबत चौकशी अंती गुरुवारी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.