चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील जाकीर हुसेन सोसायटीत एका तरुणाला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १७ रोजी घडली आहे या प्रकरणी २० रोजी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौधरीवाडा परिसरात हुजेफा खान अब्दुल रहेमान (२३) हा तरुण वास्तव्याला आहे. त्याचा परिसरात राहणारा नावेद शेख मुशीस शेख हा नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करत असतो. याबाबत हुजेफा खान याने नावेद शेख याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. याचा राग आल्याने नावेद शेख याने हुजेफा खान याला अश्लील शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर दुखापत केली.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून जळगावात शिक्षणासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचे मोबाइल त्यांच्या खोलीतून चोरट्याने चोरून नेले. ही चोरी शाहू नगर परिसरात राहत असलेल्या खोलीमध्ये शनिवार, २० रोजी सकाळी झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून तसेच नंदुरबार जिल्ह्यातील काही विद्यार्थी जळगावात शिक्षणासाठी आले आहेत. ते शाहू नगर परिसरातील भोईटे गल्ली परिसरात खोली घेऊन राहतात. २० रोजी सकाळी सव्वा सहा ते पावणे सात वाजेदरम्यान त्यांच्या खोलीतून चोरट्याने चार मोबाईल चोरून नेले. यामध्ये रोहित मोहन राठोड (२४, रा. उजलोद, ता. शहादा), संदीप विठ्ठल पाटील (२४, रा. गोजोरा, ता. पाचोरा), अविनाथ विजय…
फैजपूर : प्रतिनिधी शहरातील दक्षिण बाहेरपेठमधील विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव सुरेश मुरलीधर कोळी, असे आहे. सुरेश यांचा विवाह चार महिन्यांपूर्वीच झाला. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्याने चार दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. या विवचनेत वावरत असताना शनिवारी राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांचा लक्षात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. रवींद्र मोरे, अनिल पाटील करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. मागणीची पूर्तता न केल्याने मिरज येथे सासरी मारहाण करीत छळ केला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या हर्षिता दीपक मेघानी (वय ३०) यांचा विवाह सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दीपक अशोक मेघानी यांच्याशी झाला. दरम्यान, लग्नाच्या सहा महिन्यांनंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात केली. दीपक मेघानी याने व्यवसाय करण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैशांची मागणी पूर्ण केली नाही, याचा राग आल्याने दीपक मेघानी, सासरच्या कुटुंबीयांनी शारीरिक…
मेष : जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. वृषभ : ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून…
जळगाव : प्रतिनिधी आज जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एक मोठे विधान केले आहे. खडसेंनी नाईलाजाने निर्णय घेतला असावा. त्यांच्यावर तपास यंत्रणांचादबाव होता असे मोठे विधान यांनी केले आहे. यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा हल्लबोलही केला आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ”आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य आयात करत होता. आता तोच देश निर्यात करत आहे. आज मोदी यांचे राज्य आहे. बळीराजाला मदत होईल असे काही सरकारकडून केले जात नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका…
जळगाव : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव खुनाच्या घटनेने हादरले आहे. आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या जिनिंग मागील शेतात एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. त्याच जिनींगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या एका तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनींग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले. शेतात चारा कुट्टी पसरलेल्या प्लास्टिक फटवर डोक्यावर मागील बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी फिल्टर प्लॅटसाठी घेतलेल्या पाइपांचे थकीत असलेले पाच लाख रुपये वसूल करण्यासाठी गेलेले सूर्यभान हिंमत पाटील (३९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) व त्यांच्या सहकाऱ्यावर चार जणांनी धारदार शस्त्राने वार केला. ही घटना शुक्रवार, १९ रोजी तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाइप व्यावसायिक असलेले सूर्यभान पाटील यांच्याकडून कुसुंबा येथील एका जणाने पाइप घेतले होते. त्याचे पाच लाख रुपये थकीत असल्याने ते घेण्यासाठी पाटील हे कुसुंबा येथील संबंधिताच्या फिल्टर प्लॅटवर गेले व थकीत पैशाची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यावर चौघांनी धारदार शस्त्राने वार केला. यात पाटील यांना…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. काही छुपे विरोधक तुमच्याबद्दल अफवा पसरवण्याच्या तयारीत आहेत. त्यांना अशी संधी देऊ नका. आज तुमची प्रतिभा तुमचा सन्मान वाढवण्यात प्रभावी ठरू शकते. तुम्हाला काही कामे दिली जातील जी तुम्ही सहज पूर्ण कराल. या राशीचे लोक जे विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आज नवीन शोधात मोठे यश मिळू शकते. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज संपूर्ण दिवस पालकांसोबत घालवला जाईल. आज तुम्ही स्वतः बनवलेली खीर तुमच्या पालकांना खाऊ घातल्यास कौटुंबिक सुखात वाढ होईल. आज तुम्ही मर्यादित विचारांना तोडण्यात यशस्वी व्हाल ज्यामुळे तुम्ही विचारांच्या क्षेत्रातून बाहेर पडू शकत…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लग्नाच्या कार्यक्रमासाठी रिक्षाने प्रवास करत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पटली होवून ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. भिवसन खंडू कोळी वय ५० रा. पाळधी ता. धरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भिवसन कोळी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे आज शनिवारी २० एप्रिल…

