विजय पाटील : जळगाव लोकसभा निवडणुकीतील जळगाव मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील (पवार) यांचा दांडगा जनसंपर्क व युवकांमधील असलेला संपर्काच्या जोरावर त्यांनी जळगाव मतदारसंघात प्रचाराची जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांची मतदारसंघांमध्ये दररोज प्रचार सभा व गाठीभेटी या सुरू आहे. जळगाव मतदारसंघात मावीआचे उमेदवार करण पाटील (पवार) हे भाजपचे स्मिता वाघ यांच्याशी त्यांची सरळ लढत आहे. करण पवार यांचे जनसामान्यांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क च्या जोरावर त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून ते घराघरापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश मिळालेले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा संपर्क असल्याने त्याचे गाठीभेटी सोबत सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ बांधण्यात ते यशस्वी…
Author: editor desk
माढा : वृत्तसंस्था माढा येथे शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी असं म्हटलं आहे. तसेच मोदींनी आजवर गॅस, वीज, तरुणांना रोजगार याबाबत दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप देखील पवारांनी भरसभेत सर्वांना ऐकवली आहे. मोदींनी २०१४ साली पन्नास दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत ५० टक्के खाली आणणार, असं आश्वासन दिलं होतं. मात्र पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गॅस ११०० रूपये झाला आहे. २०१४ साली मोदींनी बेकारी कमी करून हाताला काम देऊ असं सांगितलं होतं, परंतु बेकारी कमी झाली नाही. १०० पैकी ८७ तरुण बेकार आहेत, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत टीकास्त्र…
विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज दिवसेंदिवस निवडणुका या खर्चिक होत चाललेल्या आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लंके मामा दिंडोरीचे सर यांच्याकडे कुठे फंडिंग होता मग त्यांना उमेदवारी दिली भैयासाहेबांना का नाही हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही बाजारांनी साहेबांना व आव्हाड व पाटलांना सांगून अगोदर तुमच्याकडे माल किती आहे हे दाखवा मगच तुम्हाला उमेदवारी अशी आट टाकली गेली. हे भैया साहेबांना सांगा तरच ते रिंगणातून माघार होतील असे नेत्यांचे कान भरले गेले मुक्ताईनगर आघाडीवर होते. भैय्यासाहेब यांची ओळख साहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून आहे. परंतु पक्षात काल-परवा दाखल झालेले पक्षातील बाजारू काहींनी भैया साहेबांची कमकुवत बाजू…
पारोळा : प्रतिनिधी पारोळा येथे मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर कुटुंबियांची दुचाकी घसरुन अपघात झाला. दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मायलेकाला चिरडले. यामध्ये पूनम प्रतिक पाटील (वय २४) व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य सुनिल पाटील या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील सारवे, बाभळे नाग फाट्याजवळ घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. सविस्तर वृत्त असे कि, नंदूरबार जिल्ह्यातील कुकावल येथील गुरांचे डॉक्टर असलेले प्रतिक सुनिल पाटील हे पत्नी पुनम व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य यांना घेवून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे (एमएच…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात एकटीच वास्तव्यास असलेल्या सत्तर वर्षीय वृद्धेचा घरातच मृत्यु ओढवून कुजलेला मृतदेह सापडला. कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर सोमवार दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शेजारच्यांच्या मदतीने मृतदेह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रीम कॉलनीत अन्जुमनबी बिस्मील्ला खाटिक (वय-७०) या खुबा नगर जवळील मशीदी शेजारी वास्तव्यास होत्या. त्यांचा मुलगा सलीम बिस्मील्ला हा व्यवायानिमीत्त मुंबईत स्थायीक झाला असून पती बिस्मील्ला खाटिक यांचे निधन झाल्यानंतर अन्जुमनबी या एकट्याच राहत होत्या. कोणाकडूनही मिळालेल्या आर्थिक मदतीवर त्या स्वतःचा उदनिर्वाह करीत होत्या. मधुमेह,…
नाशिक : वृत्तसंस्था सटाणा-नामपूर रस्त्यावरील खिरमाणी फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील वाहकासह सर्व ७६ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, सटाणा आगाराची प्रतापपूर-सटाणा बस (क्र. एमएच २० बीएल ४२५१) मंगळवारी (दि.२३) दुपारी चार वाजेच्या सुमारास नामपूरहून सटाण्याच्या दिशेने येत असताना खिरमाणी फाट्याजवळ बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक आर. जी. ह्याळीज यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रसंगावधान दाखवत वाहक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मदतीने बसमधील सर्व ७६ प्रवाशांना सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली. यावेळी याच रस्त्याने…
जळगाव : प्रतिनिधी घरगुती वादातून विवाहितेला उपाशी ठेवत तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. ही घटना दि. २२ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा परिसरातील माहेर असलेल्या निलोफर शेख वसीम कुरेशी (वय २६) यांचा विवाह जामनेर तालुक्यातील वाघारी येथील शेख वसीम शेख फरीद कुरेशी यांच्यासोबत झाला आहे. घरगुती वादाच्या कारणावरुन पतीसह सासरच्यांकडून विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेचा उपाशी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.…
मेष आजचा दिवस अनुकूल राहील. या राशीच्या राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज वारंवार होणाऱ्या बदलांमुळे कोणताही निर्णय घेण्यास वेळ लागू शकतो. आज लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि ते त्यांच्या कामासाठी तुमचा सल्ला घेतील. तुमचा वेळ वाया घालवू नका. गरजूंना अन्नदान केल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. आज इतरांसोबत आनंद शेअर केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल. तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. वृषभ आज भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. आज नियोजित कामे पूर्ण होतील. त्यामुळे आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. आज तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. खूप दिवसांपासून येत असलेल्या समस्या आजच सोडवण्याची गरज आहे,…
पाचोरा : प्रतिनिधी नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्या यासाठी शहरातील श्रीराम मंदिरात हनुमान चालीसा पठण व महा आरती करण्यात आली.आज श्री महावीर हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने सकाळी ११ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर सियावर रामचंद्र की जय , पवनपुत्र हनुमान की जय ,भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,तालुका प्रमुख…
जळगाव : प्रतिनिधी कुसुंबा शिवारातील फातेमा नगरात तरूणाच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच रोख 23 हजारांची रोकड मिळून एकूण 43 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी 20 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, अमन अनिस पटेल (30, रा. फातेमा नगर, कुसुंबा शिवार) हे आपल्या परिवारसह वास्तव्याला आहे. एका कंपनीमध्ये सेल्समन आहेत. मंगळवार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता ते घर बंद करून बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी…

