धरणगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवार, दि. २५ रोजी धरणगाव तालुक्यातील कवठळ, चोरगाव, धार, शेरी यासह विविध गावांना भेटी देऊन प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलींना सर्वच ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थानी स्वयंस्फूर्तीने या रॅलींमध्ये सहभागी होत एकच वादा… करण दादा.., करणदादा पाटील… दिल्लीला जातील, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गुरुवार, दि. २५ रोजी कवठळ, चोरगाव, धार, शेरी, निमखेडा, झुरखेडा, पथराड आदी गावांत प्रचार रॅली काढण्यात आल्या. कवठळ येथे कालिका माता मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील घरोघरी जाऊन ‘मशाल’ चिन्हाला…
Author: editor desk
मेष – आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने काही महत्त्वाचे यश संपादन करू शकतात. कोणतेही काम लवकर पूर्ण करण्याचा विचार करा. मुलाच्या चुकांवर रागावण्याऐवजी त्यांना सहज समजवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट संस्थेशी संबंधित असाल, तर त्याच्या संबंधित कार्यात नक्कीच हातभार लावा, यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल. बाहेरील मसालेदार पदार्थ खाणे टाळा, तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आज तुम्ही काही कामासाठी अनेक मोठे निर्णय घेऊ शकता. व्यवसायात काही आव्हाने असतील, तथापि, तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य परिणाम मिळतील. प्रलंबित पेमेंट मिळाल्यानंतर तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल.…
जळगाव : प्रतिनिधी मेहरूण तलावात उडी घेऊन कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. सविस्तर वृत्त असे कि, विलास बाळकृष्ण वाणी (वय वर्ष ४९, रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरुण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी येथील बँजो केमिकल कंपनीत कामगार म्हणून काम करून ते मेहरूण परिसरात वास्तव्याला होते. होते. गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांनी मेहरूण तलाव येथे जाऊन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. विलास वाणी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय…
जळगाव : प्रतिनिधी लग्नाच्या रात्रीनंतर पहाटेच्या सुमारास नववधू लाखाचे दागिणे घेवून पसार झाली. जळगावातील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी लग्न जुळविणार्या पूजा विजय माने (32, रा.महाडीकवाडी, सांगली), नववधू नंदीनी राजू गायकवाड (रा. अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथून पसार झाल्यानंतर याच तरुणीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसर्या तरुणासोबत लग्न लावल्याचा प्रकार घडला. फसवणूक करणारे रॅकेटच कार्यरत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशिनाथ चौधरी यांचा मुलगा मयुर याचे लग्न करायचे असल्याने त्यासंदर्भात 13 फेब्रुवारी रोजी त्यांना पूजा विजय माने या महिलेचा…
अमळनेर : प्रतिनिधी जाब विचारायला गेलेल्या मायलेकास चौघांनी मारहाण केल्याची घटना चोपडाई येथे नुकतीच घडली. विशाल भागवत मोरे (२३, चोपडाई, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्या शाळेच्या आवारात गोकुळ रामा पाटील हा लघुशंकेसाठी बसला होता. त्याला याबाबत जाब विचारला असता, त्याने उलट उत्तर दिले. ही बाब विशालची आई वत्सलाबाई मोरे यांनी गोकुळ याचा भाऊ संजय याच्या कानावर घातली. त्यावेळेस गोकुळ पाटील शिवीगाळ करू लागला. त्याचा मुलगा राकेश पाटील याने लाकडी दांडा उचलून मारहाण करण्यासा सुरुवात केली. यात डोक्याला मार लागल्याने विशाल याला जखम झाली. गोकुळ पाटील, संजय…
अमळनेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील इंदोर व धारदरम्यान चोरून आणलेला लोखंडाने भरलेला ट्रक एस. एस. टी. पथकाच्या सतर्कतेने तालुक्यातील मुडी मांडळ भागात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व लोखंड असा एकूण २० लाखांचा माल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान घाटाबिल्लो येथील इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद याच्या घरासमोरून १० ते १२ टन लोखंडाने भरलेला ट्रक (एमपी४०/जीए७७८) अज्ञात चोरट्याने २३ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरून नेला. हा ट्रक २४ रोजी पहाटे अमळनेर तालुक्यातील मुडी मांडळ भागातून जात होता. निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर असलेले विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, हेकॉ भरत गायकवाड व पोकों दिनेश…
जळगाव : प्रतिनिधी शनी पेठ पोलिस चौकी जवळून बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई करत मंगळवारी दुपारी १ वाजता पकडला. मात्र, चालकाने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा न करता भरधाव वेगाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, महसूल पथकाने विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले असता चालक नवनाथ रोहिदास बाविस्कर (३०, रा. कोळंबा, ता. चोपडा) याने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात न नेता, पसार झाला. मंडल अधिकारी छाया कोळी यांनी…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या लंगडा आंबा येथे एका २३ वर्षीय तरुणावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करीत तेथीलच दोघांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि तरुणाच्या आणि घराच्या दिशेने दगडफेक केली. यात तरुणास दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलिसांत दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आदिवासी गावातील रहिवासी आमाशा गिला बारेला (वय २३) याच्या घरी दोघे जण आले. दारूच्या नशेत असलेल्या एकाने तरुणावर पोलिसांचा खबरी आहे, तुझ्यामुळे माझ्या वडिलांना पोलिसांनी पकडले, असा आरोप करीत शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. घराच्या दिशेने दगडफेक करून त्यांच्या घराचे नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या दिशेने वीट मारून फेकल्याने त्यांच्या…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गिरणा नदीकाठालगत असलेल्या जुने वडजी शिवारातील गोरख महारू शेवरे यांच्या शेतात बिबट्याने हल्ला करून गोन्हा ठार केल्याची घटना बुधवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही वर्षांपासून वडजी परिसरात विशेष करून गिरणा नदी परिसरातील शिवारात बिबट्याचे दर्शन होत असते. जुने वडजी हा शिवार गिरणा नदीच्या परिसरात येत असल्याने नेहमीच हिरवा असतो. या वर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका, ऊस क्षेत्र बहरले आहे. या क्षेत्रात बिबट्याचा अधिवास असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. गिरणा नदीकाठावरील जुने वडजी शिवारात गोरख महारू शेवरे यांच्या शेतात दोन गायी, एक गोन्हा बांधलेला होता. मंगळवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत गोरख…
मेष आज तुमचा दिवस जबाबदाऱ्यांनी भरलेला असेल. आज, ऑफिसमधील मित्र तुमच्या प्रोजेक्टमुळे आश्चर्यचकित होतील. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रगतीने खूप आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील. सर्वांसोबत एकत्र अभ्यास करण्याची संधी मिळेल. आज तुमचे आरोग्य नेहमीपेक्षा चांगले राहील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळत राहील. पण सतत मेहनत करावी लागेल. आज तुमचे काही मित्र तुम्हाला भेटायला घरी येऊ शकतात. जे तुम्हाला खूप छान वाटेल. विद्यार्थी कोणत्याही प्रकल्पात त्यांच्या वरिष्ठांची मदत घेऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या कामाची क्षमता वाढवावी. यामुळे तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार…

