नाशिक : वृत्तसंस्था अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू असून, न्यायालयाने खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या माहितीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान अशोक खरातने केलेले दावे अत्यंत वादग्रस्त ठरत आहेत. महिलांसोबत केलेली कृती ही ‘विधीचाच एक भाग’ असल्याचे सांगत त्याने आरोपांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच “मी कुणावरही जबरदस्ती केली नाही” आणि “मी लोकांचे भले केले, पण तेच माझ्यावर उलटले,” असे म्हणत त्याने आपली बाजू मांडली. याशिवाय “माझ्या अंतर्मनाने मला धोका…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत विविध पौराणिक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलाकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते ‘महाबली मारुती’च्या वेशभूषेत सहभागी झालेल्या एका तरुणाचे. प्रभावी व्यक्तिमत्त्व, आकर्षक पोशाख आणि साजेशी अंगभाषा यामुळे हा तरुण मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईमध्ये अक्षरशः चढाओढ लागल्याचे चित्र दिसून आले. यावेळी शोभायात्रेत आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका व राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान यांसह…
रावेर : प्रतिनिधी पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक करताना चार जणांना रंगेहात पकडले असून, त्यांना मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपी गणदास गबू डुडवे (वय ३८), अमित सुजाण मोरे (वय २१), सावन रणजित मोरे (वय २४, सर्व रा. मेंढागड, खरगोन), हेमराज होरपाल चव्हाण (वय २२, रा. मांडवखेडा, खरगोन) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत पाल येथील व्यापारी यांचे अवैध गोडाऊनमध्ये धाडी टाकून धावडा, सलाई, कड प्रजातीचा एकूण ७ हजार ५०० किलो अंदाजित रक्कम १५ लाख रुपये किमतीचा डिंक जप्त करण्यात आला. तसेच…
जळगाव : प्रतिनिधी शाळेतून घरी जाणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून रस्त्यावर थांबवून तिचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका शाळेजवळ घडली. याप्रकरणी एकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून आपल्या घराकडे जात असतांना संशयित याने स्कुटीवरून या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार २४ मार्चला दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास घडला. याच संशयिताने यापूर्वीही पीडित मुलीस चिठ्ठी देवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पीडिताने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून तपास पो. उ.नि. अरूण बाविस्कर,…
भडगाव : प्रतिनिधी सततच्या तक्रारी आणि गुन्ह्यांच्या तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक शर्मा यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः दाखल गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपींना अटक करण्यात झालेली दिरंगाई, तसेच पोलिस ठाण्यातील लूज सुपरविजन याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई करत त्यांची तत्काळ बदली करण्यात आली. यापूर्वीही निरीक्षक महेश शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी असताना पाणीपुरवठा पाइप चोरी…
आजचे राशिभविष्य दि.२७ मार्च २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. तुमच्या सर्व समस्या लवकरच सुटतील. तुम्हाला शासकीय नोकरीत मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता आणि त्यांच्यासोबत तुमचा वेळ खूप छान जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही एका प्रकल्पावर सर्वोत्तम सल्ला द्याल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वृषभ राशी तुमच्या सध्याच्या समस्या सुटतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाऊ शकते. तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या वागणुकीतील सकारात्मक बदलांमुळे तुम्हाला नवीन मित्र मिळू शकतात. मिथुन राशी विद्यार्थ्यांना…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल जाणवत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना, अवकाळी पावसाची चाहूल लागल्याने वातावरण अस्थिर झाले आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो, तर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार करत खळबळजनक विधान केले आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडले, तेथून पोस्टमॉर्टमपर्यंतची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा थेट इशारा तटकरे यांनी दिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी दावा केला होता की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवायचा होता. या आरोपांनंतर तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आज पत्रकारांशी संवाद साधत रोहित पवारांवर निशाणा…
नाशिक : वृत्तसंस्था राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एका तृतीयपंथी व्यक्तीचा सहभाग असल्याचा दावा संबंधित व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषदेत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असून, तो मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चित्रित झाल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आणि मंत्री एकत्र दिसत असून, परिसरात दारू व खाद्यपदार्थ असल्याचेही सांगितले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे…
जळगाव : प्रतिनिधी वर्षापुर्वी केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद) या तरुणाचा संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी (रा. दिनकर नगर) चॉपरने भोसकून निघुण खून केला होता. संशयित सुर्यवंशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो परिसरात दहशत माजवित होता. त्याची दहशत कमी करण्यासाठी शनिपेठ पोलिसांनी जैनाबाद आणि दिनकर नगर परिसरातून त्याची धिंड काढली. पोलिसांच्या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. संशयितावर हद्दपारीची कारवाई झाली असती तर निष्पाप तरुणाचा जीव वाचला असता. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथे कामाला असलेला नितीन काळे हा मित्राचा साखरपुडा आणि न्यायालयात तारीख असल्याने जळगावात आला होता. दि. २२ मार्च रोजी दुपारी नितीन…

