Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या तरूणाचा १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी दि.२ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यश नंदकिशोर मोरे (वय २२) रा. स्वप्निल अपार्टमेंट योगेश्वर नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार दि.२ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घूसून १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुणे ते रावेर ही बस शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजिंठा घाटातील फॉरेस्ट गेटसमोरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या बसमध्ये ६६ प्रवासी होते. त्यातील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात जामनेरच्या चौघांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर आगारातील बस क्रमांक एम.एच. ४० वाय. ५१९७ ही बस फॉरेस्ट गेट समोरून बस जात असताना चालक योगेश तायडे यांचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जाऊन ७ फूट खाली जाऊन पलटी झाली. या बसमध्ये एकण ६६ प्रवासी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने नजीकच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ‘देख के चल’ असे सांगितल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी प्रशिक ईश्वर जाधव (२३, रा. गेंदालाल मिल) यांच्यासह त्यांच्या बहिणीला मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी जाधव हे घरात गेले असता त्यांच्या घरात घुसून टोळक्याने साहित्याची नासधूस केली. ही घटना बुधवार, १ मे रोजी दुपारी ११ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवार, २ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, हमाली काम करणारे प्रशिक जाधव हे कानळदा रस्त्यावर असताना ते तन्या (पूर्ण नाव समजू शकले नाही) याला ‘देख के चल’ असे बोलले त्याचा राग आल्याने तन्यासह अन्य चार ते पाच जणांनी शिवीगाळ करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या नवी पेठ परिसरातील एका व्यक्तीवर रेल्वे पोलिसांनी गुरुवार दि.२ रोजी कारवाई केली. त्याच्याकडून ५६ ई-रेल आरक्षण तिकीट जप्त करीत रेल्वे अधिनियम कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, विजयकुमार वालेचा (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. नवी पेठेतील निखिल एजन्सी नावाच्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकली. विकास केदारनाथ बिर्ला (वय ६१) याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या दुकानाची झडती घेतली असता आरक्षण केलेले १ लाख ६८ हजार, ३५४ रुपये किमतीचे एकूण ५६ ई-तिकिट मिळून आले. पोलिसांनी मोबाईलसह संशयित बिर्ला याला ताब्यात घेत रेल्वे पोलीस अधिनियम कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. तपास…

Read More

यावल : प्रतिनिधी भुसावळ ते फैजपूर रोडवर भोरटेक गावाजवळील हॉटेलच्या पुढील वळणावर एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक तेथून फरार झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ ते फैजपूर रोडवर भोरटेक गाव आहे. या गावाच्या शिवारात हॉटेलच्या पुढील वळणावर रस्त्याच्या कडेला दुचाकीसह नीलेश गंगाराम राखुंडे (१९, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) व राकेश जहारीया बारेला (२८, रा. नेपानगर, ता. जि. ब-हाणपूर) है उभे होते. त्यांना शेखर कैलास विश्वकर्मा (रा. आष्टा, ता. जि. सिहोर मध्य प्रदेश) याने कंटनेरने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नीलेश…

Read More

चोपडा : प्रतिनिधी इंधनाचे भाव सतत वाढतच आहेत. शेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; परंतु केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी चोपडा, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथे आयोजित सभेत केली. पवार म्हणाले की, हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत वर्षभर शेतकरी आंदोलन चालले; तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नाही. महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत…

Read More

मेष आज तुमचा दिवस व्यस्त असेल. तुमचा बॉस तुम्हाला काही नवीन जबाबदारी सोपवू शकतो, जी तुम्ही मेहनतीने पूर्ण कराल. तुमच्या कामाबद्दल तुमची प्रशंसा होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. कला-साहित्य क्षेत्रात कल राहील. या राशीचे लोक जे क्रीडा जगताशी संबंधित आहेत ते आज त्यांच्या सरावात व्यस्त असतील. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत पालकांचे सहकार्य मिळेल. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी पार्टीसाठी येऊ शकतो. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. समाजहितासाठी केलेल्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही तुमचे मत तुमच्या वरिष्ठांसमोर…

Read More

 जळगाव : विजय पाटील रावेर लोकसभा मतदार संघातील मुक्ताईनगरची जबाबदारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे. आज मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा असून मुक्ताईनगर येथील नियोजित सभास्थनाचे छायाचित्र काही तरी वेगळाच संदेश देत आहेत. इथे लावलेल्या एकही बॅनरवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे नाव व छायाचित्र नाही. वहिनी रक्षा खडसे यांना भा.ज. पा. चे तिकीट जाहीर झाल्यावर व वडील एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तोंडी राजीनामा दिल्यानंतर आपण पवार साहेबांसोबतच राहू अशी भूमिका रोहिणी ताईंनी घेत लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार जोमाने करू असे वक्तव्य केले होते. आणि तसा त्यांनी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष ठाकरे गटाने जोरदार प्रचार करीत असतांना आता याच ठाकरे गटाला नाशिक मतदार संघात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बडा नेता आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत महायुतीमधील पेच सुटत नव्हता. एकीकडे अखेर महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विजय करंजकर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी डावलून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानं करंजकर यांनी बंडाचा झेंडा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून यात ठाकरे गट देखील मागे नाही. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. या घटनेमध्ये पायटल आणि त्याचा असिस्टंट सुखरुप आहेत. अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉफ्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुषमा अंधारे गुरूवारी महाड येथे सभेसाठी आल्या होत्या. याठिकाणची सभा आटपून त्या आज बारामतीमध्ये होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरने त्या मेळाव्यासाठी जाणार होत्या. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते.…

Read More