मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असतांना राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सराफाकडे खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असतना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला बोलावून प्रेम केले नाही तर भावाला काहीही करून टाकू, अशी धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ही अल्पवयीन मुलगी दि. २९ रोजी सायंकाळी बसलेली असताना आरोपी आणि दोन अल्पवयीन मुले या गल्लीतून गेली. त्यावेळी आरोपीने तिला बोलावले. आणि तिचा विनयभंग केला. त्याचा जाब मुलीच्या वडिलांनी विचारला. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख करीत आहेत.
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वढोदा येथील एका घरात झालेल्या दोन लाख रुपयांहून अधिकच्या घरफोडी प्रकरणी दोन परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, वढोदा येथे राहणारे प्रदीप दिनकर सपकाळे यांच्या घरात ८ ते २९ एप्रिल रोजीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सपकाळे कुटुंब हे घराच्या छतावर झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक लाख पन्नास हजार रुपये व दागिन्यांसह मोबाइल असा एकूण दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. शोधकामी यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान पठाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकों किरण धनगर यांच्यासह…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खंडाळा गावाजवळील पुलावर जुन्या वादातून दोघांना ४ जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २९ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ५ भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रितेश राजेंद्र महाजन (वय २१, रा. खंडाळा, ता. भुसावळ) यास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे पवन राजू कोळी, सुशील अनिल कोळी, गणेश सुरेश कोळी आणि सुनील दीपचंद कोळी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याचवेळी रितेशच्या मावसभावालाही बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी रितेश महाजन याने भुसावळ तालुका पोलिसांत तक्रार दिल्यावरून गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी एरियातील डी-सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीला १७ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत ५ जणांचा मृत्यू तर २२ जखमी होते. आता मृतांचा आकडा अजून वाढला असून एका जखमी तरुणाचा ऐन कामगारदिनीच, बुधवारी उपचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चंद्रकांत लक्ष्मण पाटील (वय २७, रा. किरवाडा, पो. साकळी बोराडे, जि. धुळे) असे मृत कामगाराचे नाव आहे. मोरया कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेत चंद्रकांत हा ७० टक्के भाजला गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी ११:४२ वाजता त्याचा मृत्यू झाला. मयत कामगाराच्या पश्चात आई,…
चाळीसगाव : प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महायुती शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा संकल्प जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. दौलतनाना शितोळे साहेब यांनी केला असून जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र जय मल्हार क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हयातील सर्व पदाधिकारी यांच्यावतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण…
मेष : धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. वृषभ : आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. योगगुरू रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली या आयुर्वेदिक कंपनीवर उत्तराखंड सरकारने कारवाई सुरू केली आहे. उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे. उत्तराखंड औषध नियंत्रण विभागाच्या परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या दिव्या फार्मसी कंपनीच्या उत्पादनांवर ही बंदी घातली आहे. तसेच रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्याविरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची प्रचार जोरदार सुरु असून संविधान वाचवणे आणि मजबूत करणे ही भाजपची भूमिका राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची भूमिका आहे. मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपने देशात ४०० पारचा नारा देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा या निवडणुकीत प्रचार सुरू केला आहे. त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली…
पाचोरा : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार, २ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी सहभागी होत पाचोरेकरांना मतदानासाठी साद घातली. शिवसेनेचे उमेदवार करणदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात जावून घराघरापर्यंत पोहचून मशाल हे चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. करणदादा पाटील…

