Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रोहिणी या गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला शनिवारी रात्रीच अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास हा पत्नी भारताबाई हिच्यावर संशय घेऊन वाद घालत होता, तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या प्रकारास कंटाळून ती मुलगी योगिता हिच्यासोबत माहेरी रोहिणी येथे निघून आली होती. त्यानंतर, दोन-तीन दिवसांपूर्वी भारताबाई हिच्या वडिलांनी जावई कैलास याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी परिवारातील सर्वांनी त्याची…

Read More

मेष आजचा दिवस आनंदाचा जाईल. आज नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुमचे विरोधक देखील होऊ शकतात ज्यांच्यापासून तुम्हाला दूर राहावे लागेल. आज तुम्ही योजनेनुसार काम करावे. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन उपकरणे समाविष्ट केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. वृषभ आज आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. आज तुमच्या पैशांचा योग्य वापर करा. तुमच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे बजेट बनवा, तरच तुम्ही भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचा विचार करू शकता. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आनंदी राहण्याची कारणे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार असून आज सायंकाळी पाच वाजता बारातमीमधील प्रचार थांबणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांचा धुरळा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या हायहोल्टेज लढतीकडे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता ही मिशन हायस्कूल मैदानावरील सभेने व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच ही जागा अजित पवार यांनी मिळवली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांची सांगता सभा या ठिकाणी होईल. सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव…

Read More

यावल : प्रतिनिधी किनगाव येथील एका किराणा दुकानातून शुक्रवारी अडीच लाख रुपयांचा गुटखा सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग आणि त्यांच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, किनगाव, ता. यावल येथील अनिल किराणा दुकानात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने किनगाव येथे छापा टाकून हा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिस नाईक अल्ताफ अली हसन अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किराणा दुकानदार जगन्नाथ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये व पोलिस करीत आहे.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन भावांना खंडणीची मागणी करत लोखंडी विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी रात्री उशिराने शहर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रूपेश रवींद्र कानोजे (वय ३२) आणि त्यांचा भाऊ सूरज कानोजे (रा. ओंकारेश्वर मंदिर) कडे त्याच परिसरात राहणारे पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल यांनी कानोजे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्याला विरोध केला असता दोघांनी रूपेश यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लांबवली. तर विळ्याने दोघांवर…

Read More

जामनेर : प्रतिनिधी कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तळेगाव (ता. जामनेर) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. अनिकेत जितेंद्र जोहरे (१३) आणि अभय भागवत कोळी (१७) अशी या मृत मुलांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दोन्ही मुले शुक्रवारी सकाळी दोर घेऊन घराबाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत मुले घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी शोध घेण्यास सुरूवात केली. काही मुलांनी अनिकेत व अभय ज्या मार्गाने गेले त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी शोध घेतला त्यावेळी एका विहिरीत दोघांचे मृतदेह आढळले. रात्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Read More

मेष – पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या कामात यश मिळवाल आणि सर्वांना सोबत घेऊन जाल. स्पर्धेची भावना तुमच्या मनात कायम राहील आणि रक्ताच्या नात्यावर पूर्ण भर द्याल. तुमच्या काही नवीन योजना यशस्वी होतील. तुमच्या पैशांबाबत योजना करून पुढे जावे. जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. वृषभ – नशिबाची साथ मिळाल्यास तुमचे काम सहज पूर्ण होईल. जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल. कोणतीही महत्त्वाची माहिती बाहेरील व्यक्तीसोबत शेअर करू नका. जे लोक नोकरी सोबत अर्धवेळ काम करण्याचा विचार करत होते, मग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे. यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा सार्विकत्रक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया करणे सुरु आहे. राज्य उत्पादन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या वृध्दाचे बंद घर फोडून घरातून ६२ हजार रूपये किंमतीचे वेगवेगळे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. १ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अरूण जगन्नाथ सांगवीकर (वय ६५) रा. पांडूरंग सोसायटी, संभाजी नगर, जळगाव हे वृध्द आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दि. २० एप्रिल रोजी रात्री १० वाजता ते घर बंद करून बाहेरगावी कामाच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी…

Read More