नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून समोर आली आहे. सासरी राहणाऱ्य़ा भाडेकरूसोबतच सूनेचे प्रेमसंबंध जुळले. जेव्हा महिलेच्या सासूला याबद्दल समजलं तेव्हा तिने सूनेच्या आईला याबाबत माहिती दिली. मात्र, सूनेच्या आईने जे काही उत्तर दिलं, जे ऐकून सगळेच थक्क झाले. सूनेच्या आईने तिच्या सासूलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बिंदू कटरा चौकी परिसरातील आहे. सविस्तर वृत्त असे कि, सहा वर्षांपूर्वी सदर परिसरात एका मुलीचा विवाह झाला होता. इतक्यात एक तरुण तिच्या सासरच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहू लागला. आधी सून आणि भाडेकरू…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडत असतांना नुकतेच लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन एका तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ३० मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरात अवेज शेख अब्बास (वय २१) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार दि. ३० मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अवेज पिंप्राळा हुडको परिसरात कामाच्या निमित्ताने आलेला होता त्यावेळी लग्नाचे लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून रईस शेख बबलू, तात्या शेख आणि सोहेल शेख सलीम तिघे रा. पिंप्राळा, हुडको…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा अधिक असल्याने प्रत्येक घरात कुलरचा वापर केला जात आहे. प्रामुख्याने खिडकीत लावण्यासाठी डेझर्ट कुलर वापरले जातात. दरम्यान बाहेरून आल्यानंतर कुलर लावून त्यात पाणी टाकत असताना विजेचा जोरदार झटका बसला. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडली. तर या घटनेत लहान मुलगा थोडक्यात बचावला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील बिबानगर परिसरात वास्तव्यास असलेले भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८) यांचा मृत्यू झाला आहे. भास्कर बोरसे हे राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मूळ जळगाव तालुक्यातील कठोरा येथील रहिवासी असून मुलांचे शिक्षण आणि ड्यूटीमुळे जळगावात स्थायिक झाले होते. दरम्यान १…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना नियमित घडत असतांना एक धक्कादायक घटना रावेरात घडली आहे. सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताई नगरातील बेलसवाडी येथील भारत मसाने याच्यासोबत माधुरी यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा ही चिमुरडी आहे. मात्र पतीशी…
जळगाव : प्रतिनिधी मित्राला घेवून पैसे घेण्यासाठी येत असलेल्या दुचाकीस्वारांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पवन वैजनाथ मंगरुळे (वय २४, रा. वाकोद, ता. जामनेर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र राहुल लक्ष्मण सोनवणे हा गंभीर जखमी झाला. ही घटना म्हसावद गावाजवळ शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मंगरुळे हा त्याचा मित्र राहुल सोनवणे याच्यासोबत पैसे घेण्यासाठी म्हसावद जाण्यासाठी (एमएच १९, डीएन ४०५७) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते म्हसावद गावाजवळ पोहचल्यानंतर त्यांना अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात सोशल मिडीयाचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा एकदा डाऊन झाले आहेत. जगभरातील युजर्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नाहीत. दरम्यान १८ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे वृत्त देखील ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स डाऊन झाल्याने अनेक युजर्स चिंतेत आहेत. डाउन डिटेक्टरच्या म्हणण्यानुसार, फेसबुकच्या शेकडो युजर्संनी आज (दि.१५) या ॲप्समध्ये प्रवेश करताना समस्या नोंदवल्या. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्षणीय व्यत्यय आले, युजर्संना पृष्ठे लोड करण्यात आणि अॅप्समधील वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यात मोठ्या प्रमाणात समस्या आल्याचे तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत खुलासा (Facebook, Instagram down) करण्यात आलेले…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच राज्यातील मराठी अभिनेते श्रेयस तळपदेचा आगामी चित्रपट कर्तम भुगतमची चर्चा होत असताना त्याने एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. निवडणुकीच्या वलयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या राजकीय परिस्थितीत मोदी निवडून येण्यासारखे वातावरण असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे. विचारलेल्या प्रश्नावर श्रेयसने उत्तम उत्तर दिल्याने त्याची चर्चा होताना दिसतेय. श्रेयस तळपदे काय म्हणाला? श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितले की, “सध्या देशातील राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हे आहेत. त्यांचं मला विशेष कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशात विकासकामे करत आहेत. ते आधी…
अमळनेरः प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) या शिक्षकाला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर न्यायालयातील न्या. पी. आर. चौधरी यांनी दिला. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनिल संतोष भागवत याने दि. ४ फेब्रुवारी रोजी वर्गाला खेळण्यासाठी सोडले होते. दरम्यान, वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी पिण्यासाठी आली असता, सुनिल भागवत यांनी त्या मुलीचा हात पकडून तीचा विनयभंग केला. तसेच दुसऱ्या दिवशी शिक्षक त्या मुलीच्या घरी जावून त्याने तिच्या पालकांचा मोबाईल क्रमांकावरुन तिच्यासोबत अश्लिल…
जळगाव मिरर | १५ मे २०२४ तक्रार देण्यासाठी आलेल्या दिनेश दिलीप मांडोळे याने पोलिस ठाण्यात गळफास घेण्याची धमकी देत पोलिसांसोबत वाद घातला. तसेच रात्रीच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून देण्याची धमकी देत शांततेचा भंग केल्याची घटना घडली होती. सोमवार दि. १४ रोजी पुन्हा मांडोळे याने पोलिसांच्या अंगावर धावून जात त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिक नगरातील दिनेश दिलीप मांडोळे हा तरुण दि. १३ मे रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात आला. यावेळी त्याचया बरगळीजवळ जखम झालेली असल्याने त्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याची आई आशाबाई मांडोळे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव येथील पिंप्री प्र. दे. येथील शेतकरी रघुनाथ मांगो पाटील यांच्या शेतात बांधलेल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्याचवेळी बाजूच्या मुख्य रस्त्यावर वाहन आले. त्यामुळे या बिबट्याने पळ काढला. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच शिवारात एका मादीने दोन बछड्यांना जन्म दिला होता. तेव्हापासून या शिवारात अनेक मुक्या प्राण्यांचा जीव गेल्याने शिवारात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस आधी बिबट्याच्या हल्ल्यात हरिण आणि तीन मोरांचा मृत्यू झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी या परिसरात बिबट्याला वावरताना प्रत्यक्ष पाहिले आहे. सकाळी वासरावर झालेल्या हल्ल्यानंतर या बाजूला कालव्याच्या मोरीचे काम करणारे…

