Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » थरारक : तीन वर्षाच्या चिमुरडीचा सावत्र बापाने केला खून
    क्राईम

    थरारक : तीन वर्षाच्या चिमुरडीचा सावत्र बापाने केला खून

    editor deskBy editor deskJune 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना नियमित घडत असतांना एक धक्कादायक घटना रावेरात घडली आहे. सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताई नगरातील बेलसवाडी येथील भारत मसाने याच्यासोबत माधुरी यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा ही चिमुरडी आहे.

    मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे सावत्रबाप अजयकडे राहत होती. दि. ३१ मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले आणि गळा आवळून त्याचा निघृण खून केला. ही घटना अजयची पत्नी माधुरी हीला माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पतीपत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मृतदेहाची विल्हेवाट लावत असतांना माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खाबाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    April 27, 2026

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.