Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत
    क्राईम

    बसमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

    editor deskBy editor deskJune 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भुसावळहून जळगावला येणाऱ्या बसमधून दोन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली होती. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी बस स्थानकात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) याच्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडन चोरलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विठ्ठलपेठेतील सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. शनिवार दि. १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. नवीन बस स्थानक येथे ते बसमधून उतरले असता, त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष लक्ष्मण वानखेडे (वय ४३, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांच्या शर्टाच्या खिशातून देखील चोरीला गेला होता. यावेळी बारी यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तुषार पाटील यांना एक इसम नवीन बस स्थानकात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

    पोलीस निरीक्षक रामेश मानगांवकर यांनी लागलीच गुन्हेशोध पथकातील पोहेकॉ सलिम तडवी, पोकों तुषार पाटील व जयेश मोरे यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरलेले दोन मोबाईल मिळून आले. पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    April 27, 2026

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.