मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याच्या चर्चेमुळे महायुतीला फटका बसला. अशातच कांद्याने रडवले, सोयाबीन, कापसाच्या उतरलेल्या दराचाही मतदानावर परिणाम झाला, अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. शेतपिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चिती करण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आणि किंमत आयोगाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही कबुली दिली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीची चर्चा घडवून आणल्याने फटका बसला. राज्यातील संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याची चर्चा आदींमुळे महायुतीला मोठा फटका बसला. अनेक जागा यामुळे गमवाव्या लागल्या. ४०० पार या घोषणेमुळे काहीतरी गडबड होईल, या भीतीने लोकांनी एनडीएला मतदान केले नाही. शिवाय राज्यातील शेतकऱ्यांनीही विरोधात मत दिल्याचे…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शटर व कुलूप तोडून चार दुकानातून मोबाइल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेल्याची घटना ९ रोजी रात्री उशिरा ते १० जून सकाळच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, खड्डा जीनला लागून असलेल्या दुकानाजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भावसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे वरचे अर्धे शटर कापलेले दिसून आले. दुकानदाराने पाहिले असता त्याच्या दुकानातील ग्राईंडर मशीन, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिकल साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरीला गेले होते. त्याच्या बाजूला असलेल्या दोन-तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाइल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून दुरुस्तीला आलेले ८ ते १० अँड्रॉईड मोबाइल,…
चोपडा : प्रतिनिधी आदिवासी भागात सातपुडा पर्वतरांगांमधील वैजापूर गावाच्या हद्दीत खाऱ्यापाडा ते वैजापूर या रोडवर मंगळवारी सायंकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (३०, पार उमर्टी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हा तीन गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतुसे घेऊन जाताना ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये पोहेकॉ मनोज दुसाने यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे तीन गावठी कट्टे आणि दहा हजार रुपये किमतीची १० काडतुसे, असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोहेकॉ पल्लवी सुभाष वाणी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कावेरी…
जळगाव: प्रतिनिधी गेल्या एक ते दीड महिन्यापासून आजीकडे आलेल्या मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, ११ जून रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास जळगावातील हरिविठ्ठल नगरात घडली. सविस्तर वृत्त असे कि, दरम्यान, ही आत्महत्या नसून विवाहितेच्या पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीनाचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यापूर्वी जळगावात हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आली होती. काही दिवसांपूर्वीच एका खासगी डॉक्टरकडे कामाला…
मेष : ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. वृषभ : आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील लढत असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे यांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे. मनोज जरांगे यांचा बीपी खालावला आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज सकाळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर तपासली. त्यामध्ये डॉक्टरांना बीपी खालावल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. पण त्यांनी मी उपचार घेणार नाही, माझी भूमिका कायम आहे. जोपर्यंत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली असून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापूर्वी मोदी 3.0 सरकारचा शंभर दिवसांचा अॅक्सन प्लॅन तयार केला होता. त्याचा उल्लेख त्यांनी काही ठिकाणी केला होता. आता मोदी कॅबिनट या 100 दिवसांच्या अॅक्सन प्लॅनला अंतिम रुप देत आहे. मोदी 3.0 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, यामुळे निर्णय घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी सहकारी पक्षांशी चर्चा करणार आहे. परंतु या 100 दिवसांत मोठा निर्णय होणार आहे. मोदी सरकारच्या काळात निर्गुंतवणुकीत अजून आघाडी मिळाली नाही. आतापर्यंत सरकारला फारसे यश मिळालेले नाही. पण आता मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत आपल्या अजेंड्याअंतर्गत काही मोठी…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलमध्ये पैसे पाठविण्यासाठी व मागविण्यासाठी गुगल पेचा मोठा वापर होत असतांना आता याच ग्राहकांना कंपनीने मोठा धक्का दिला आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमें प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठे निर्णय घेतला आहे. सध्या गुगल पे हे अॅप एका देशात बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे हे अॅप बंद करण्यात आले आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला? याबाबत नेमके आणि ठोस कारण समोर आलेले नाही. गुगल पे हे अॅप ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित मानले जाते. भारताने वापराच्या बाबतीत हे अॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे.…
पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. एनडीएला बहुमत मिळाले. पण अनेक राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या. यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. विनोद तावडे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी अत्यंत चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांना मोठी संधी दिली जाऊ शकते, असं सूचक विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. पक्ष चालवण्यासाठी तावडे यांची भूमिका मोठी आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत बसलेल्या या फटक्यामुळे आता भाजपचे बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. सध्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था यंदा राज्यात पावसाची चांगली सुरूवात झाली आहे. सगळीकडे वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना आणि विदर्भ बुलढाणा जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून आजही अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येत्या 48 तासांत अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून येत्या 13 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार…

