जळगाव : प्रतिनिधी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा. तांबापुरा) याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर तो परिसरातून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला. सविस्तर वृत्त असे कि, भोलासिंग बावरी याने ११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. त्याला शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकों राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी अटक केली होती. त्याला बुधवार, १२ जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर बाहेरून तो पोलिसांची नजर चुकवून पळून…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिसांच्या पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपीची घरझडती सुरू असताना एकाच्या घरात ३ धारदार हत्यारे सापडली. या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करतानाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, समाधान बळीराम निकम (शिव कॉलनी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याने त्याच्या घरात कोयता व सुऱ्यासारखे धारदार हत्यार ठेवले आहेत.या माहितीच्या आधारे त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घराच्या बैठक रूममधील लोखंडी पलंगाच्या बॉक्समध्ये लोखंडी धारदार कोयता व दोन लोखंडी सुरे, अशी एकूण ३…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात विकास दूध फेडरेशनची दूध पावडर घेऊन निघालेला ट्रक मुद्देमालासह गायब झाला आहे. या ट्रकमधून ७५ लाख ४५ हजार ७२० रुपयांची दूध पावडर लखनौ येथे नेण्यात येत होती; परंतु ५ जून रोजी जळगावहून निघालेला ट्रक लखनौ येथे इच्छित स्थळी पोहोचलाच नाही. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात ट्रक मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमध्ये (क्र. आरजे ११, जीबी ९५७९) २६ टन पावडर भरून ट्रक मालक रसतम कमलेश बघेल (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) आणि चालक फिरोज सरजुद्दीन (रा. आग्रा उत्तर प्रदेश) हे दोघे निघाले. परंतु दूध पावडरने भरलेला ट्रक पाच दिवस…
मेष : तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. वृषभ : ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरातील दुरुस्तीची…
मुंबई : वृत्तसंस्था सरकारकडून मध्यस्थीसाठी कुणीही येत नाही. सरकारने आरक्षणाचा विषय तातडीने तडीस नेतो, असे आश्वासन दिले म्हणून सलाईन लावली आहे. सरकारने जर शब्द फिरवला तर पुन्हा उपचार बंद करीन, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि. १२) पत्रकार परिषदेत दिला. आरक्षण तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारच्या वतीने आरक्षण विषय लवकर तडीस नेऊ, असे आश्वासन मिळाल्याने सलाईन लावली आहे. आमचा विषय मार्गी लागला पाहिजे, आमचे कुणबी प्रमाणपत्र निघायला हवेत. सरकारला आता पुराव्यांचा आधार मिळालेला आहे. आता सगे सोयरे कायदा व्हायला हवा. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार…
जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात राहणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ११ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षे चिमुकली आपले आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. दरम्यान गावात राहणारा एकाने याने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला. त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील सईदा सुखल गावात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफ कॉन्स्टेबल कबीर दास जखमी झाले. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थही जखमी झाला आहे. हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला पोलिसांनी ठार केले आहे. दुसरा दहशतवादी गावातच कुठेतरी लपला आहे. त्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या डीआयजी आणि एसएसपी कठुआ यांच्या वाहनावर गोळीबार केला. दोघेही थोडक्यात बचावले. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू…
जळगाव : प्रतिनिधी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील भुरे खान जखमी झाला. तो बालंबाल बचावला मात्र रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना महामार्गावरील साकेगाव पुलाजवळ रविवार दि. ९ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील हेडकरी मोहल्ल्यात मेहमूद खान सरफराज खान (वय ३४) हे रिक्षाचालक वास्तव्यास आहे. ते त्यांचे भाऊ भुरे खान यांच्याोबत (एम.एच.१९ सी. डब्ल्यू ०८५३) क्रमांकाच्या रिक्षाने भुसावळकडून नशिराबाद येथे येत होते. रिक्षा साकेगाव पुलावरून जात असताना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एम. एच. ४ एल.वाय. ४०७१) क्रमांकाच्या कंटेनरन…
जळगाव : प्रतिनिधी बैलगाडी घेवून शेतात जात असलेल्या शेतक-याला रेल्वेच्या बोगद्यामध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पाण्यात बैलगाडी टाकली, परंतु पाणी दहा ते बारा फुट असल्यामुळे शेतकऱ्याने बैलाची सुटका केली. मात्र सुकलाल लालचंद माळी (वय ६३, रा. असोदा, ता. जळगाव) यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता असोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याजवळ घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले, मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात सुकलाल लालचंद माळी हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात मुसळधार…

