Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कुवेतमध्ये सहा मजली इमारतीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांपैकी ४८ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार मृतांमध्ये केरळच्या २४ जणांसह ४५ भारतीयांचा समावेश असून तीन जण फिलिपाइन्सचे नागरिक आहेत. भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाचे एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह हेदेखील कुवेतमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील दुर्घटनेबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान मदतनिधीतून मृत भारतीयांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर केंद्र सरकार, केरळ सरकार आणि दोन व्यापाऱ्यांकडून केरळमधील मृत कुटुंबाच्या वारसांना एकूण १४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे गेल्या काही दिवसांत अडावद शहरासह परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पाटचारी भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीला गेलेल्या तब्बल ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. याच संशयिताचा घरफोड्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सप्टेंबर २०२२ मध्ये चोरी झालेली दुचाकी पाटचारी भागात राहणाऱ्या तरुणाकडे असल्याची गुप्त माहिती सपोनि संतोष चव्हाण यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अडावद परिसर पिंजून काढला; परंतु संशयित हाती लागला नाही. अधिक शोध घेतला असता तो जंगल रस्त्याने उनपदेवच्या जंगलात पसार झाला. पोलिसांनी सुमारे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बखळ प्लॉट नावावर करून देतो असे सांगून जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील एका तरुणाची १८ लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गौरव रवींद्र पवार (वय ४०, रा. कोजागिरी बंगलो, मुक्ताईनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याची चंद्रकांत सतीश तोष्णीवाल (रा. आदर्श नगर, जळगाव) याच्याशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून चंद्रकांत तोष्णीवाल याने गौरव पवार याच्याकडून वेळोवेळी एकूण…

Read More

यावल : प्रतिनिधी वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत अवैधरीत्या कटाई केलेल्या लाकडाची वाहतूक करताना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आला वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि. ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने सापळा रचून यावल शहरातील फैजपूर रस्ता मनुदेवी मंदिराजवळ टाटा कंपनीचे ३११८ या वाहन क्रमांक एमएच १८ बीजी २१५३ या चारचाकी वाहनाची चौकशी केली असता या मध्ये विनापरवाना अवैध लाकूड भरलेले दिसून आले, वाहनचालकाकडे लाकूड वाहतुकीसंदर्भात परवाना मिळून आला नाही. यावेळी वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने चारचाकी वाहन मुद्देमालासह लाखांचा अवैधरीत्या कटाई केलेला लाकूड पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन…

Read More

जामनेर : प्रतिनिधी एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्यात आले. या प्रकरणी सुभाष उमाजी भिल (३५) या संशयित आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची १० पथके तालुक्यासह वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. संशयितास पकडून देणाऱ्यास पोलिसांतर्फे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याने गुन्ह्यातील कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, मृत बालिकेच्या शवविच्छेदन अहवालावरून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी संशयित भिल याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्याचा ठावठिकाणा कळविणाऱ्यास किंवा पकडून देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल, असे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पोलिस अधीक्षक महेश्वर…

Read More

मेष आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना अनेक नव्या ठिकाणी ज्ञानार्जन करण्याची संधी मिळण्याचा आहे. कुटुंबवत्सल लोकांना घरातील काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यवसाय चांगला करण्यासाठी नवीन उपकरणे घ्यावी लागतील. घरात सुखसुविधांच्या वस्तू खरेदी करण्यावर तुमचा भर असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आईचं जुनं दुखणं डोकं वर काढेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या कामात धावपळ करावी लागणार आहे. तुम्हाला तुमचा सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. वाहनांचा वापर अत्यंत सांभाळून करा, नाही तर अडचण होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या घरी एखाद्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान मंगळवारी 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३ जून) विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संखेत राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवल्यास सुनेत्रा यांचा विजय सहज होईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती, मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामती…

Read More

जळगाव : प्रतीनिधी शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार १२ जून रोजी दुपारी १२.३० वाजता कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजल शेख कादिर वय-१८, रा. मास्टर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील तांबपुरा परिसरात असलेल्या खदानीजवळ फैजल शेख कादीर हा हातात तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक विकास सातदिवे,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नुकतेच लोकसभा निवडणुकी मोठ्या उत्साहात झाली, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. या निवडणुकीत मनसेने देखील भाजपला पाठींबा दिला होता मात्र आता मनसे विधानसभेच्या तयारीला लागली असून आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची राज्य व्यापी बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केले नसल्याचे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सातत्याने सुरु असतांना आज नुकतेच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील एका अपंग असलेल्या पतीला २ जून रोजी दुपारी १ वाजता शेतात नेऊन विहिरीत ढकलून खून केला होता. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी उघडकीस आला आहे. यात प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा खून पतीनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याचे तिने कबुली दिली आहे या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश…

Read More