मेष : मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो म्हणून, आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. वृषभ : दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक कॉलनी परिसरात उत्तम प्रकारचे रस्ते, गटारी झाल्या आहे. पण अनेक परिसरात आज देखील रस्ते व गटारी होवू शकलेले नाही त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनपात नेहमीच तक्रारी येत असतात, याचीच दखल घेत मनपाचे माजी महापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे शहरातील आणखी २०० ते ३०० कोटीचा निधी मिळावा यासाठी साकडे घातले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, जळगांव शहरासाठी भरघोस निधी यापूर्वी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रत्यनातून मिळाला आहे. यासाठी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी २५ कोटींचा निधी मिळवून दिला. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मिळवून दिला. त्यातुन ४२ कोटींचे…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक भूमिकेने सध्या चर्चेत आहे. त्यातच मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशारा सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आले आहे. कलिनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी असताना हा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ८ वर पहोचली आहे तर ३० जण जखमी झाल्याचे पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी ‘ANI’शी बोलताना सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, या भीषण रेल्वे अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे,” असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर बंगालच्या…
वरणगावः प्रतिनिधी वरणगाव शिवारातील विट भट्टयीजवळील मोकळ्या जागेत पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटनान ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद देविदास शिंदे (वय ३५) रा. वरणगाव ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते चालक असून ओमनी कार क्रमांक (एमएच २१ सी २६१७) चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची कार ही वरणगाव शिवारातील विट भट्टीजवळ पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली. त्यांनी…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात परप्रांतीय १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना शनिवार १५ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही भुसावळ तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना शनिवार १५ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला…
मुंबई : वृत्तसंस्था नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे आपले सर्व बालेकिल्ले राखले असून आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या तयारीच्या अनुषंगाने रविवारी शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे; परंतु या निवडणुकीत झालेल्या काही चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागले पाहिजे. या लोकसभा निवडणुकीत…
मुंबई : वृत्तसंस्था अरे छोड यार’ या यूट्युब चॅनलवर अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला दक्षिण सायबर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. बनवारीलाल लातुरलाल गुजर असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील फाजलपुरा, बोर्डा गावातील रहिवासी असलेल्या गुजर याने येथील एका द्रुतगती महामार्गावर एक व्हिडीओ बनवला. यात त्याने सलमान खानच्या हत्येबाबत खुलासा करत कख्यात गैंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावांचा उल्लेख केला. हा व्हिडीओ त्याने ‘अरे छोड यार’ या यूट्युब चॅनलवर अपलोड केला. याची माहिती मिळताच दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६ (२), ५०४…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमाकडून सुमारे १० लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा ५० किलो ३१५ ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण २२ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून, तो पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई १६ रोजी करण्यात आली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, अशोक भरतसिंग पाटील (५४, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) हा चाळीसगाव शहरामध्ये गांजा विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक संदीप पाटील, जितेंद्र धनराळे निवासी नायब तहसीलदार, पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, राहुल भीमराव सोनवणे, विनोद विठ्ठल भोई, पोना महेंद्र प्रकाश पाटील,…
अमळनेर : प्रतिनिधी रिल्स बनवून व्हायरल केल्याने तीन जणांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गरीब नवाज चौकात घडली. सविस्तर वृत्त असे कि, मिल चाळ येथील हर्षलसिंग ठाकूर, राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे तिघे जण दुचाकीने गांधलीपुरा भागात जात होते. त्याचवेळी गरीब नवाज चौकात सलमान खान रफा, आकीब अली सय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक व एजाज पठाण या पाच जणांनी त्यांची दुचाकी थांबवत दोघांना खाली ओढत मारहाण केली. रिल्स बनवून व्हायरल करतात, असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. हर्षलसिंग यालाही दुचाकीवरून खाली ओढत सलमान खान याने वीट व…

