Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रिल्स व्हायरल केल्याने तिघांना मारहाण
    अमळनेर

    रिल्स व्हायरल केल्याने तिघांना मारहाण

    editor deskBy editor deskJune 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    रिल्स बनवून व्हायरल केल्याने तीन जणांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गरीब नवाज चौकात घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, मिल चाळ येथील हर्षलसिंग ठाकूर, राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे तिघे जण दुचाकीने गांधलीपुरा भागात जात होते. त्याचवेळी गरीब नवाज चौकात सलमान खान रफा, आकीब अली सय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक व एजाज पठाण या पाच जणांनी त्यांची दुचाकी थांबवत दोघांना खाली ओढत मारहाण केली. रिल्स बनवून व्हायरल करतात, असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. हर्षलसिंग यालाही दुचाकीवरून खाली ओढत सलमान खान याने वीट व लोखंडी रॉडने मारहाण केली. पाचही जण लाकडी काठी, लोखंडी रॉड व विटांनी तिघांना मारहाण करीत होते. त्याचवेळी राजेश खरारेची आई रजनी खरारे व बहीण लक्ष्मी सुनील खरारे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026

    बिबानगरात ‘रोमिओ’चा हैदोस : विद्यार्थिनीचा छळ, घरावर दगडफेक

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.