Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक उत्साहात झाली. नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळवण्याचा आमचा मार्ग आणखी सुकर होईल, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्त मतदान झाले असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र 18 सभा झाल्या तसेच एक रोड शो झाला. ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या आणि रोड शो झाला, त्या – त्या जागेवर जनतेने महाविकास…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्‍याचे ANIने दिले आहे. अबुझमदच्या जंगलात नक्षलींनी आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांमध्‍ये संयुक्त शोध मोहिम राबवली. अबुझमदच्या कुतुल फरसाबेदा कोडामेटा भागात अद्‍याप चकमक सुरु आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील माडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडामधील डीआरजी, एसटीएफ,आणि ITBP 53 व्या बटालियनचे सैन्य या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सरोदे हॉस्पिटलच्या गेटसमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार १२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार १३ जून रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, हरीश राजेश निकुंभ (वय २९) रा. सुधाकर नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील सरोदे हॉस्पिटले येथे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीके ९६८२ ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी ही हॉस्पिटलच्या समोर पार्कीगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोणवाडी गावातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अंगलट करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार १२ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील लोणवाडी गावातील एका भागात २२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १२ जून रोजी रात्री ११ वाजता त्याच गावात राहणारा संशयित आरोपी मिलीन हा महिलेच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर महिलेशी अंगलट करून अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतात सकाळी नांगरटी केली आणि त्यानंतर शेतातचा झाडाला गळफास घेत अलोक रवींद्र लुले (वय १८, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १४ जून रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. वडिलांच्या अपघातानंतर शेतीकामात त्यांना मदत करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधार हरवला आहे. सविस्तर वृत्त असे कि, देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व अंघोळ करून पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर शेजारील शेतातील मंडळींना अलोक हा गळफास…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी गुरांची अवैधरीत्या वाहतूक करणारे वाहन मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले. या मालवाहू वाहनात पाच बैल कोंबून वाहतूक केली जात होती, त्या बैलांची सुटका करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पूर्णाड फाट्याजवळ एका वाहनामधून (एमएच ४१, जी- ८९२) गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने १२ जून रोजी पहाटे पाच वाजता गाडी थांबविली. या वाहनाची तपासणी करीत वाहनामधील पाच बैलांची सुटका करण्यात आली. याबाबत चालकाजवळ विचारणा केली असता कोणताही परवाना नव्हता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दीपक घनंशराज चौकसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुरांना अंतुर्ली येथील कामधेनू गोशाळेत ठेवण्यात आले…

Read More

मेष राशी आज तुमचा दिवस बरा जाईल. या राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्या शॉपिंगसाठी जाऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. आज स्वतःवर विश्वास ठेवा. या राशीच्या मंत्र्यांचे परदेश दौरे होऊ शकतात. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. वृषभ राशी आज तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. जेव्हा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू कराल तेव्हा तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. केलेले प्रवासाचे बेत यशस्वी होतील आणि या प्रवासात तुम्हाला नवीन अनुभव मिळतील. लव्हमेट मदत करेल, आज कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी सोपे जाईल. आज व्यवसायात अधिक नफा मिळाल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भडगाव व अमळनेर येथील तीन विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत झाल्यानंतर दि.१४ रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. त्या ठिकाणी चार जून रोजी सायंकाळी रशियामध्ये वालखोव नदीत बुडून अमळनेर येथील जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी (दाेघे अमळनेर) आणि हर्षल अनंतराव देसले (भडगाव) या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेनंतर चार दिवसानंतर त्यांचे मृतदेह सापडले होते. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तिघा विद्यार्थ्यांचे मृतदेह रशियातून त्या विद्यार्थ्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात. गजा मारणे हा कुख्यात गुंड असून त्याने नीलेश लंके यांची भेट घेतल्याने आता राजकीय वाद रंगणार आहे. दरम्यान खासदार नीलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने नीलेश लंकेंचा सत्कार केला. नीलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. याच दरम्यान जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईंकडेच चौकशीची मागणी केली आहे. माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्याची मला यादी द्या, अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली आहे. दरम्यान, माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. वेळ आल्यावर त्या माणसाचं नावही घेणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला, त्यामुळे नेमके 100 कोटी कुणी कमावलेत या…

Read More