चोपडा : प्रतिनिधी अवैध पध्दतीने गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैजापूर ते बोरअजंटी रस्त्यादरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाइ केली. या वेळी पिस्तूल, काडतूस, दुचाकी, मोबाइल असा जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १७ रोजी ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरापासून १८ किमी अंतरावरील गावठी तेल्या घाटातून तुषार हनुमंत पवार (वय २०) व भरत सुखदेव जायगुडे (वय२२) हे दोघे दोन गावठी कट्टे नेताना पोलिसांनी त्यांना मध्यरात्री पकडले. हे दोघे आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याजवळील ५० हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे, चार हजार रुपये…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी काल दि. १८/०६ /२०२४ रोजी अनेकांना विष बाधा झाल्याची उघडकीस आली. सोमवार रोजी १७/०६ /२०२४ रोजी कमळगाव येथे आठवले बाजार भरत असतो. त्या अनुशंगाने आसपासचे गावातील अनेक लोक हे बाजार निमित्ताने तेथे बाजारासाठी येत असतात. तेथे पाणीपुरीवाला हा कमळगाव येथे पाणीपुरी हातगाडीवर पाणीपुरी विकतो. दरम्यान तेथे आसपासच्या गाव चांदसनी, पिंप्री, मितावली, येथील अनेक लहान मुले, तरुण, वृद्ध अनेक्कानी पाणीपुरी खाली. ती खाल्याने सोमवार रोजी रात्री पर्यंत कोणालाही काहीच त्रास जाणवला नाही. सकाळी मंगळवार १० ते ११ सकाळच्या सुमारापासून अनेकांना त्याची लक्षणे जाणवू लागली. तसेच काहींना ताप, उलटी, मळमळ चक्कर येणे अशा प्रकारची जाणवत होती. दरम्यान खाजगी दवाखाना…
मेष राशी कुटुंबात एखाद्याच्या प्रगतीमुळे उत्सवाचे वातावरण असेल आणि मुलांना भेटवस्तू दिल्या जातील. मुलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण असेल. आज काही काळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. घराची व्यवस्था चांगली राहील. राजकीय-सामाजिक वर्तुळ विस्तारण्यास फायदा होईल. आज ज्येष्ठांसोबत वेळ घालवा, त्यांना आनंद मिळेल. कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने तुमचे मन उत्साहाने भरले जाईल आणि भविष्यातील योजनाही लवकरच पूर्ण होतील. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. घरामध्ये सुखसोयींशी संबंधित काही नवीन वस्तूंची खरेदी होण्याचीही शक्यता आहे. आज व्यावसायिक कामे मंद असतील, परंतु सध्याच्या परिस्थितीत संयम राखणे चांगले. आज नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. आज तुमचा जोडीदार तुम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यातच आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी हाके यांची भेट घेतली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असा आरोप अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच अजित पवार गटात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत बोलतांना सुनील तटकरे यांनी या चर्चा अफवा असल्याचे म्हंटले आहे. सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ओबीसी आरक्षणामुळे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा करून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात केला जाणार, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशना अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता असल्याने राज्यात महायुतीतील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत याविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात प्रेम प्रकरणातून हाणामारीसह खुनाच्या नेहमीच घटना घडत असतांना नुकतेच वसई शहरातून देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. हा हल्ला रस्त्याच्या मधोमध झाला, जिथे 29 वर्षीय हल्लेखोराने पीडितेच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुकतेच ब्रेकअप झाल्याचे या हल्ल्यामागील कारण होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी रस्त्यावर पडून होती. इंटरनेटवर या भयानक घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आरोपीने हातात पाना धरलेला दिसत आहे. तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी आणि शस्त्र टाकून देण्याआधी “माझ्यासोबत…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पद भरती २०२२-२३ प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १९ जूनपासून ही भरती प्रक्रिया आयुक्तालये आणि जिल्हा पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली असून यासाठी तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले असल्याची माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस भरती प्रक्रियेत सर्वाधिक नऊ हजार ५९५ पोलीस शिपाई पदे असून यासाठी आठ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल राज्य राखीव पोलीस बलात चार हजार ३४९ पोलीस शिपाई पदे…
चाळीसगाव : प्रतिनिधी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन दुचाकी शहर पोलिसांच्या पथकाने जप्त केली आहे. तसेच चोरट्यांनी अटक करण्यात आली. ही कारवाई दि.१७ रोजी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, नानासाहेब सुदाम आहेर (रा. जळगाव खु॥ ता. नांदगाव जि. नाशिक) यांची ७० हजार रुपये किमतीची दुचाकी घाटरोड, चाळीसगाव येथील विठ्ठल सभा मंगल कार्यालय जवळून दि.१६ रोजी चोरीस गेल्या बाबत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास पथक स्थापन केले. या पथकाने घाटरोड बायपास परिसरात…
रावेर : प्रतिनिधी घरात परिवार असताना दारू पिण्यासाठी चार-पाच सवंगडी आणून गोंधळ कशाला घालताय? असे हटकल्याचा राग आल्याने काकाने पुतण्यावर चाकूचे चार-पाच वार केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काकाला अटक करण्यात आली. रावेर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुभाष उर्फ बाळू गोविंदा महाजन (वय ६०, रा. हनुमान व्यायामशाळेजवळ, रावेर) हे त्यांच्या घरी चार पाच मित्रांना आणून दारू पीत होते. घरात परिवार असताना दारूच्या नशेतील त्या चार पाचही जणांचा गोंधळ पाहून शेजार राहणारा पुतण्या रवींद्र प्रल्हाद महाजन (वय ४०) हा काकाला बोलला, ‘तुम्ही…

