मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला वीस दिवस पूर्ण झाले तरी अपघातामागील कारणांबाबतचे गूढ कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ठोस प्रगती दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, अपघातामागील सत्य शोधण्यासाठी रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी ते वैमानिक, निवृत्त अधिकारी आणि हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. उड्डाणापूर्वीची तपासणी, हवामानस्थिती, यंत्रणांची कार्यक्षमता, वैमानिकांचा…
Author: editor desk
बुलढाणा : वृत्तसंस्था भाजपला देशाचे संविधान बदलायचे असून महापुरुषांविषयी सातत्याने आक्षेप घेणे हे त्यांचे ठरलेले धोरण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि ऐतिहासिक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. विशेषतः भाजप आणि टिपू सुलतान यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. सपकाळ म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे टिपू सुलतानांविरोधात सातत्याने वक्तव्य करतात. मात्र राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या काळात काही ठिकाणी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांमध्ये व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानांचे चित्र लावलेले दिसले होते, असा दावा त्यांनी केला. राजकीय सोयीप्रमाणे भूमिका बदलण्याचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरातील ग्रामपंचायतींवरील विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेतला आहे. राज्यातील सुमारे 16 हजार ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात आहे. मात्र, सरपंच व विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्रशासकपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे केली जाणार आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेने असा आरोप केला आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे गावांच्या विकासकामांना मोठा फटका बसत आहे. आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तुलनेत शासकीय कोट्यातील मनुष्यबळ…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि खुल्या आव्हानाद्वारे ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. “तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका,” असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना वयावरून टोला दिला होता. त्यावर पलटवार करत श्रीकांत शिंदे म्हणाले, “वयाच्या हिशोबाने आजार होत असतात; विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल यासारखे आजार होतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे.” श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट…
जळगाव : प्रतिनिधी शेतात पाणी भरण्यासाठी जात असलेल्या जगदिश अशोक पाटील (वय ३७, रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव) या तरुण शेतकऱ्याला जळगावकडून जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या भीष अपघातात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील नेवरा मारोती मंदिराजवळ घडली. चालक वाहन घेवून पळून जात असतांना ग्रामस्थांनी पाठलाग करीत वाहन पकडले तर चालक वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील जगदीश अशोक पाटील (वय ३७) हे तरुण शेतकरी असून त्यांचे पाचोरा रस्त्यावर शेत…
जळगाव : प्रतिनिधी दारुच्या नशेत रेल्वे रुळावर बसलेल्या तरुणांना शिवीगाळ केल्याचा रागातून अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) या तरुणाचा दोघांनी दगडाने ठेचून निघृण खून केला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह खंडेराव नगराजवळील रेल्वे रुळांमध्ये पडलेला मिळून आल्याने सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवीला जात होता. परंतू मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड मिळून आल्याने पोलिसांनी खून झाल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी १२ वीचे पेपर देणाऱ्या अल्पवयीन मुलासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खंडेराव नगरात अमर सपकाळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास…
जळगाव : प्रतिनिधी बी फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या शाम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर, ह. मु. दौलत नगर) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड तालुक्यातील शाम पाटील हा तरुण शहरातील एका महाविद्यालयात बी-फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो दौलत नगरात मित्रासोबत खोली करुन राहत होता. रविवारी त्याचा मित्र बाहेर गेलेला असतांना शाम याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास शाम याचा मित्र रुमवर आला, परंतू…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी व मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांच्या घरास दि. ७ फेब्रुवारीला मध्यरात्री दोनच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात तीनजणांना अटक करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी त्यांच्या आई व बहीण घरात झोपलेल्या होत्या. मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आल्याने गावात दहशतीचे व भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने तातडीने समांतर तपास सुरू केला व गणेश पाटील (कळमसरा) यास ताब्यात घेतले. त्याने समाधान निका याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान या प्रकरणाचा सूत्रधार हा फिर्यादी…
आजचे राशिभविष्य दि.१६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा असेल. लोक तुमच्या वागण्याने खूश होतील. तुम्ही एखाद्या मोठ्या व्यावसायिक गटासोबत भागीदारी करण्याचा विचार करू शकता. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. कलांमध्ये सहभागी असलेल्यांना समाजात आदर मिळेल आणि लोक तुमच्या सर्जनशीलतेची प्रशंसा करतील. वृषभ राशी आज तुमच्या व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त नफा होईल. नवविवाहित जोडप्यांमध्ये गोडवा येईल आणि त्यांच्या नात्यात गोडवा येईल. आज आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना आज त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. मिथुन राशी आज तुम्ही जे काही काम कराल ते मनापासून करा, ज्यामुळे तुम्हाला…
जळगाव : प्रतिनिधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाने रविवारी जळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भारतीय जनता पक्षाच्या जुने वसंत स्मृती कार्यालयापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेसह तिरडी उचलून शहरातून अंत्ययात्रा काढली. आंदोलनादरम्यान “शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या. या अंत्ययात्रेत आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह महेश चौधरी, राजू मामा, राहुल वाघ, नितीन…

