भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरला. चिराग हॉलच्या मागील सत्य साईनगर भागात शुक्रवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेधडक फायरिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या शांततेत अचानक घुमलेल्या गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, काही क्षणांसाठी परिसरात अक्षरशः धावपळ उडाली. अनेकांनी घरांचे दरवाजे बंद करून सुरक्षिततेचा आश्रय घेतला, तर काहींनी तात्काळ पोलिसांना कळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी अशा प्रकारच्या धाडसी गोळीबारामुळे शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या – अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पोपट जाधव (वय ३८) व त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय २७, दोघेही रा. शिवापुर तांडा, ता. चाळीसगाव) यांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना २८ मार्च रोजी सकाळी ९.४५ वाजण्यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे. दोघांचाही मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणे अनुक्रमे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १९/२०२६ व २०/२०२६ (बीएनएसएस कलम…
जामनेर : प्रतिनिधी शेतात मका कापणीसाठी गेलेल्या चार पैकी एका शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला तर सोबतच्या तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना नेरी दिगर परिसरातील शेतात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. ओम बाळू बोरसे (१४, नेरी दिगर ता. जामनेर) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जनता विद्यालयात इयत्ता ९ वीत शिक्षण घेत होता. गौरव शरद बोरसे, भावेश गोविंद वराडे आणि अंश शैलेश देसाई असे बचावलेल्या तीन मुलांची नावे आहेत. येथील एका शेतात शनिवारी काही शाळकरी मुले मका कापणीसाठी आले होते. दुपारी त्यांच्या अंगाला खाज सुटल्याने ते शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने…
आजचे राशिभविष्य दि.२९ मार्च २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन आणि सर्जनशील करून पाहण्याची संधी मिळेल. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात होणारे बदल उद्यासाठी फायदेशीर ठरतील. एक प्रलंबित काम आज पूर्ण होईल. तुमचा मोठा भाऊ तुम्हाला यात मदत करू शकतो. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात लाभ होईल. वृषभ राशी तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक सदस्यांकडून विशेष आदर मिळेल. थकीत देयके वसूल करण्यासाठी आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा चांगला काळ आहे. आज, नोकरी करणाऱ्यांना एका वरिष्ठ…
मुंबई : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा झाला आहे. मात्र, काही लाभार्थी महिलांना अजूनही मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, अशी तक्रार येत आहे. या प्रकरणामुळे अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि त्यांना पैसे कधी येतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. योजनेत आतापर्यंत ८६ लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. २०२४ मध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला २.४ कोटी महिला लाभार्थी होत्या. मात्र, काही निकषांमुळे आणि केवायसीमध्ये समस्या येण्यामुळे सध्या फक्त १.५ कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. परिणामी तब्बल ८६ लाख महिलांचे अर्ज योजनेतून वगळले गेले आहेत. या महिलांना फेब्रुवारीचा १५०० रुपयांचा…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल-डिझेल इंधनाचा साठा आणि त्याचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी उमा खापरे, सर्व गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप डीलर्स, तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या उपलब्ध साठ्याची सद्यस्थिती तपासण्यात आली. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच केटरर्स, हॉटेल व्यावसायिक व एमआयडीसीतील…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील भोंदू अशोक खरातसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर विधिज्ञ वकील असिम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. सरोदे यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन पाळावा ही घटनात्मक जबाबदारी न पाळणारे आहात. खरातसोबत तुमचे विशेष फोटो असल्याने तुम्ही दोषी आहात.” त्यांनी असा दावा करत मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, फक्त अशोक खरातसोबत फोटो असल्यामुळे कोणावरही कारवाई होणार नाही. तसेच, या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल…
पुणे : वृत्तसंस्था नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील या पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला तिने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर भागातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास आहे. दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास ती आपल्या जेठानीसोबत शौचालयाकडे जात असताना ही घटना घडली. त्यावेळी दोन संशयित आरोपींनी दुचाकी आडवी लावून महिलेला अडवले. यानंतर आरोपींनी महिलेकडे अश्लील मागणी करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याच वेळी महिलेच्या पतीने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच “तुमच्याने जे होईल ते करून घ्या” अशी…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे आता नुकताच खोटे नगर परिसरात एका बंद घराचा कडीकोंडा तोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खोटे नगर बस स्टॉप जवळील जय हिंद कॉलनी येथील रहिवासी क्षितीज देविदास सुरडकर (वय 30) हे खाजगी व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दिनांक 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद घर बघून दरवाज्याचा कडी कोंडा तोडून घरातून 200 ग्रॅम वजनाची चांदीची प्लेट वाटी, चमचा, ग्लास इन्व्हर्टरची बॅटरी, एलसीडी टीव्ही, तीन पितळाचे पातेले व एक पितळी समई असा ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास…

