Author: editor desk

जळगाव :  प्रतिनिधी भरधाव डंपरने धडक देत चिरडल्याने बशीरशा मकबूलशा शाह फकीर (७५, रा. वराड, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. हा अपघात २८ मार्च रोजी रात्री वराड, ता. जळगाव येथे झाला. अपघात होताच नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दापोरे, ता. एरंडोल) व मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार,  वराड येथील बशीरशा फकीर हे कामानिमित्त गावातील बसस्थानकाकडे गेले होते. त्यावेळी एक डंपर (क्र. एमएच ४७, एएस ५१४८) गावातून जात असताना जोरदार धडक…

Read More

फैजपूर :  प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यातच पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण प्रमोद भिरूड (वय २६) व धीरज विजय सोनवणे (वय २५, दोघे रा. फैजपूर) हे गुटखा खात पोलिस ठाण्यातील अंमलदाराच्या कक्षात गेले. तेथे त्यांनी गुटखा थुंकल्याने पोलिसांनी त्यांना विचारणा केली. यावेळी दोघांनी वाद घालत एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यामुळे थोडावेळ तणाव झाला होता. या प्रकरणी हवालदार रुपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसउपनिरीक्षक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जुन्या कोंडवाडा परिसरात किरकोळ वादातून गॅरेज चालकावर मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज शेख याकूब (वय ३६, रा. जाम मोहल्ला) हे खडका चौफुलीजवळ ‘सिकंदर कार’ नावाचे गॅरेज चालवतात. २७मार्च रोजी कुटुंबीयांच्या कार्यक्रमानिमित्त ते मुस्लिम कॉलनी येथे गेले असताना रात्री सुमारास गाणे लावण्याच्या कारणावरून काही युवकांमध्ये वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी फिरोज शेख घटनास्थळी गेले. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता चिराग हॉलजवळील मैदानावर चर्चा करण्यासाठी गेले असता, तेथे उपस्थित काही जणांनी एकत्र येत त्यांच्यावर शिवीगाळ करत चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची…

Read More

आजचे राशिभविष्य दि.३० मार्च २०२६ मेष राशी आज तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नियोजित कामे स्वतःहून वेळेवर पूर्ण करा नाहीतर नंतर घाई गडबडीत काम बिघडेल. आज कामाबद्ल तुम्हाला काही नवीन आणि उत्कृष्ट सूचना मिळतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तुमचे सहकारी तुमचे काम करून घेतील. तुमच्या निस्वार्थ मेहनतीला आज फळ मिळेल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. वृषभ राशी आज विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. महाविद्यालयातील तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे तुमचे शिक्षक खूश होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा खूपच चांगले राहील. जर तुम्ही लाकडी फर्निचर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ते…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाईचे सावट गडद होत असताना, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्नही तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून वारंवार “कोणतीही टंचाई नाही” असा दावा केला जात असला, तरी राज्यातीलच एका मंत्र्याने गॅस सिलिंडरची मागणी केल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून गॅस सिलिंडर्सची मागणी केली आहे. या पत्रामुळे राज्यात प्रत्यक्षात गॅस टंचाई असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोढा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, जैन धर्मातील ‘ओली आयंबील’ हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडामोडींना वेग आला असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वावरून नवीन वाद निर्माण होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पुढील सूत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हाती जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप करत, “पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या कार्यक्रमातील बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे 27 मार्च रोजी नवनिर्वाचित जिल्हा…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी तयार केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे. या समन्सनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी होईल, आणि त्यानंतर अटकेची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांमुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता. या प्रकरणात शिवसेना उपनेते सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलिसांशी भेट घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. टीव्ही 9च्या वृत्तानुसार,…

Read More

मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव जळगाव, दिनांक 28 मार्च (जिमाका)-: महाराष्ट्र् राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर…

Read More

अकोला : वृत्तसंस्था राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले असून, अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू झाला. शंकरराव शिरसाट असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते गावाचे माजी सरपंच होते. मिळालेल्या माहितीनुसार, अन्वी मिर्झापूर येथील यदुराज गॅस एजन्सीवर गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कडाक्याच्या उन्हातही अनेक नागरिक तासन्तास रांगेत उभे होते. त्याच रांगेत शंकरराव शिरसाट हेही आपला क्रमांक येण्याची वाट पाहत उभे होते. दरम्यान, उन्हाचा तीव्र तडाखा आणि दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे त्यांना अचानक चक्कर…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक आणि अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, एका पोलिस कर्मचाऱ्यानेच स्वतःच्या पोलिस असलेल्या वडिलांची विष देऊन हत्या केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल तीन वर्षे दडवून ठेवण्यात आला होता. मात्र, वैवाहिक वादातून अखेर या हत्याकांडाचा भांडाफोड झाला असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जयंत बल्लावार (वय ४५) हे पोलिस अधिकारी २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांची मुलगी आर्या बल्लावार हिने त्यांना मिल्कशेक बनवून दिला. तो पिऊन जयंत बल्लावार चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीत पोहोचले. मात्र, काही वेळातच त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले.…

Read More