Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : चेंडू घ्यायला गेला अन ६ वर्षीय बालक गेला पाण्यात वाहून
    क्राईम

    धक्कादायक : चेंडू घ्यायला गेला अन ६ वर्षीय बालक गेला पाण्यात वाहून

    editor deskBy editor deskJuly 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्याने तो काढायला गेलेला सचिन राहुल पवार (वय ६, रा. हरिविठ्ठलनगर, मूळ रा. कुसुंबा, ता. रावेर) हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली. पोहणारे तरुण, पोलिस व अग्निशमन विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चार वाजता सचिन त्याची १० वर्षांची बहीण परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेले होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू जवळच्या नाल्यात पडला. तो घेण्यासाठी सचिन नाल्यात उतरला. मात्र, त्याच वेळी पाऊस आल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो वाहत्या पाण्यात वाहून गेला. यावेळी लहान मुलांनी आरडाओरडा केली असता नागरिकांनी धाव घेतली. कुटुंबीयदेखील धावत आले. नाल्यात उतरून शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. सायंकाळी अग्निशमन विभागाचे पथकही त्याठिकाणी दाखल झाले; पण कुठेही थांगपत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस व अग्निशमन विभागाकडून त्याचा शोध सुरू होता. सचिनचे वडील राहुल किसन पवार (वय ३२) हे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.