धरणगाव : प्रतिनिधी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी सर्व सुविधांयुक्त उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामासाठी ४० कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. या रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तत्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतिगृह शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका) असणार आहे. याबरोबरच नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण, न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र…
Author: editor desk
मेष राशी आर्थिक क्षेत्रात उत्पन्न आणि खर्चात समतोल राखला जाईल. पाहुण्यांच्या भेटीमुळे घरगुती खर्चात वाढ होईल. सूर्यप्रकाश आणि श्रम संघर्ष असूनही नफा कमी होईल. चांगले पैसे मिळण्याची शक्यता. जमीन, इमारत इत्यादींच्या व्यवहाराचा विचार करून समिती स्थापन करता येईल. अचानक आर्थिक लाभ होईल. कोणत्याही व्यावसायिक योजनेत आर्थिक लाभ होईल. लग्नासारख्या शुभ कार्यात काही खर्च होईल. वृषभ राशी आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. घरातील सुखसोयींवर पैसा खर्च होईल. कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यक्रमावर जास्त खर्च करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत राहील. व्यवसायात उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भावनेमुळे प्रेमसंबंधांमध्ये जास्त पैसा खर्च कराल. मिथुन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच रशिया दौऱ्यानंतर मंगळवारी उशिरा रात्री ऑस्ट्रिया येथे पोहोचले. ४१ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड कार्पेटवर भव्य स्वागत करण्यात आले. पीएम मोदी म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील मैत्रीचे संबंध आगामी काळात आणखी मजबूत होतील. दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पीएम मोदी विमानतळावर पोहोचताच ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी यांनी अधिकृत चर्चेपूर्वी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांची खासगी डिनरच्या निमित्ताने भेट घेतली. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर…
धरणगाव : प्रतिनिधी २०२३ मध्ये दिवाळीच्या नंतर एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. अत्याचार केलेल्या आरोपीचा साक्षीदार मित्राने देखील पिडीतेसोबत झालेला अत्याचार सगळ्यांना सांगून देईल असे सांगून धमकावत पिडीतेवर शेतशिवारात नेऊन अल्पवयीन मुलीवर पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश मधील बडवाणी जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी परिवारासह धरणगाव तालुक्यातील एका शेतात वास्तव्याला आहे. आरोपी प्रवीण छत्र्या बारेला (रा. कानळदा ता.जळगाव) याने सन २०२३ मध्ये दिवाळीनंतर ४ ते ५ दिवसांनी तसेच जानेवारी २०२४ दरम्यान अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दिले. त्यानंतर धरणगाव तालुक्यातील एका शिवारात नेऊन अत्याचार केले. तसेच…
पुणे : वृत्तसंस्था अजित पवार गटाला खिंडार पडलं आहे. तब्बल ३९ पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ३९ पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. परवाच शरद पावर गटाला आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यांनतर हा ३९ नेत्यांच्या प्रवेशाने राज्यातील राजकारणावर मोठा फरक पडणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशाची तारीख आणि वेळीही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात अजित पवार गटाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. अश्यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सुरु असतांना आज पहाटे जळगाव जेलमधील एका आरोपीची काही तरी वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणाला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दत्तू प्रकाश पाटील (वय ३४, रा. फुलपाट, ता. धरणगाव) हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ जुलै रोजी घडली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरु असतांना चार दिवसानंतर त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावात दत्तू पाटील हा तरूण आईवडील, पत्नी, भाऊ आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. टाकरखेडा येथील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत होता. दैनंदिनीप्रमाणे शुक्रवारी ५ जुलै रोजी…
जळगाव : प्रतिनिधी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले खलील शेख अय्युब मणियार (वय ४५, रा. वराडसीम, ता. भुसावळ) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना दि. ८ जुलै सोमवारी गोदावरी महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील वराडसीम खलील शेख अय्युब मणियार हे दि. ८ जुलै रोजी सोमवारी भुसावळकडे जात होते. यावेळी त्यांना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकोद येथील १० मजूर फर्दापूर शिवारात शेतात काम करीत असताना मका पिकाच्या कीटकनाशकाच्या स्पर्शातून त्यांना विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून जळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यात सर्व महिला मजुरांचा समावेश आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई तेजराव जोशी (६५), सुनीता अशोक जोशी (३५), ज्योती विलास जोशी (३०), माधुरी शिवाजी जोशी (१६), उर्मिला शिवाजी जोशी (२५), छायाबाई गजानन जोशी (२८) पूजाबाई विजय जोशी (३०), उषाबाई संतोष जोशी (३५), मंगलाबाई शिवाजी जोशी (४०), गुंफाबाई उत्तम जोशी (२७ , सर्व वाकोद) हे फर्दापूर शिवारातील शेतात मजुरीसाठी गेले, यादरम्यान मका पिकाच्या पोंग्यात…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकी काढत असताना तिचा दुसऱ्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी विक्की सुनील सोनवणे (२४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शिवीगाळ करीत मारहाण केली. या तरुणाच्या – डोक्यावर व पाठीवर दगड, फरशीचे तुकडे मारल्याने त्याला दुखापत झाली आहे. ही घटना ७ जुलै रोजी भजे गल्लीतील एका हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, विक्की सोनवणे हा तरुण ७ जुलै रोजी, भजे गल्लीत मित्रांसह बसलेला होता. तो त्याची दुचाकी काढत असताना दुसऱ्या दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून त्याला दुसऱ्या दुचाकी चालकाने शिवीगाळ केली. याचा तरुणाने जाब विचारला असता त्याला…

