रावेर : प्रतिनिधी बंद कूलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागल्याने लक्ष्मण संतोष पाटील (वय ३०) या तरुण शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना अजंदे येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अजंदे येथे हातमजुरी करणाऱ्या संतोष देवराम पाटील यांचा एकुलता मुलगा लक्ष्मण उर्फ गणेश पाटील हा केळीबागेत गुरुवारी बेण्याचे कंद खोदून परतला होता. घरी येताच तो कुलर बंद करुन तो पाणी टाकत होता. त्यावेळी त्याला शॉक लागला आणि तो खाली कोसळला. त्याच्या आईने आरडाओरडा करताच त्याच्या सोबतचे संदीप बिरपन आणि इतरांनी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता महानवार यांनी तपासून मृत घोषित केले. संदीप बिरपन यांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार ते पोलिस शिपायांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया सुरु होती. बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या बदल्या केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा ६०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. ६०९ पोलिस कर्मचारी प्रशासकीय बदलीसाठी पात्र होते. त्यात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, काही जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक पदापर्यंतच्या ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया झाल्यानंतर बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले वर्षानुवर्षे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदली निश्चित मानली जात होती.…
वरणगाव : प्रतिनिधी शेतीच्या नफ्याचे पैसे घेण्यासाठी गेला असता सात ते आठ जणांनी एका युवकासह त्याची आई व पत्नीस मारहाण केली. याबाबत वरणगाव पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ जून रोजी घडली होती. याबाबत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी महिला, तिचा पती, रवी भील, नितीन भिल, नरेंद्र भिल, अजय भिल, ताडन भिल व अन्य एक अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय कैलास पाटील (२६, रा. पिंपळगाव खुर्द) याचे एका महिलेकडे शेतीचे पैसे बाकी होते. या पैशाबाबत महिलेच्या पतीकडे १९ जून रोजी मोबाइलवरून विचारणा केली असता त्याने…
मेष राशी महत्त्वाच्या कामात आज विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची गुप्त धोरणे विरोधी पक्षाला उघड होऊ देऊ नका. सामाजिक कार्यात रस वाढेल. कुटुंबात शुभ आणि धार्मिक कार्य पूर्ण होऊ शकतात. व्यापार क्षेत्राशी निगडित लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करून यश मिळेल. व्यक्तींना फायदा होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना संघर्ष करावा लागेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल. वृषभ राशी आज नोकरीच्या ठिकाणी एखाद्या अधीनस्थ व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतो. रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सुरक्षेत गुंतलेल्या सैनिकांना लक्षणीय यश मिळेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांना खूप संघर्ष करावा लागेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. तुमच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल करण्याचा…
मालेगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच मुंबईहून वडीलांच्या अंत्यविधीसाठी मालेगावी येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर वाके शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात दोघी सख्ख्या बहिणी व जावयाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे. गुरूवारी दि.11 पहाटे हा भीषण अपघात घडला. या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. सविस्तर वृत्त असे कि, वाके शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर (एमपी 09 एचआर 8322) ला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनाक्षी अरुण हिरे(वय 53) रा. टिटवाळा जिल्हा ठाणे, अनिशा विकास सावंत (वय 40) रा. राहुरी जिल्हा ठाणे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात मोठ्या घोषणा करण्यात येत असतांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, 19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचे आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी हे निवेदन दिले आहे. ”अनेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे. 5 नोव्हेंबर 2022 रोजी या दिवशी…
नाशिक : वृत्तसंस्था मालधक्का रोडच्या पाठीमागील गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटीलिंक बस डेपोच्या आवारात बसची धडक बसल्याने पाच वर्षाची बालिका जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) घडली. अपघातानंतर बसचालक फरार झाला. त्यामुळे जमावाने सिटीलिंक बसचालक मद्यसेवन करून बस चालवत असल्याचा आरोप केला. तसेच संतप्त जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत जमावाची समजूत काढत शांतता प्रस्थापित केली. मिळालेल्या माहितीनुसार, सान्वी सागर गवई (५, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, नाशिक रोड ) असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. ती पहिलीला शिकत होती. नेहमीप्रमाणे ती शाळेतून तिच्या आजोबांसोबत घरी जात होती. बस डेपोच्या आवारात एमएच १५ जीव्ही ७७१९ क्रमांकाच्या बसचालकाने…
जळगाव : प्रतिनिधी खूप प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसल्याने तणावात असलेल्या नीलेश सुरेश सोनवणे (२५, रा. अयोध्या नगर) या तरुणाने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (९ जुलै) रात्री घडली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेला नीलेश सोनवणे हा तरुण आई-वडील व मोठ्या भावासह अयोध्यानगरात राहत होता. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. परंतू नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात…
जळगाव : प्रतिनिधी शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या तीन जणांसह चोरीचे दागिने घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सविस्तर वृत्त असे कि, घरफोडी चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिले होते. त्यांनी पोउनि राहुल तायडे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, पोहेकॉ कमलाकर बागूल, संदीप पाटील, प्रवीण मांडाळे, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले. माहितीच्या आधारावर पथकाने विशाल मुरलीधर दाभाडे, शुभम उर्फ मोनू प्रभाकर चव्हाण (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यात विशाल संतोष भोई (रा. तांबापुरा) याच्यासह शनिपेठ पोलिस ठाणे, जिल्हापेठ पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्यानजीक धावत्या ट्रेलरच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागून त्याने पेट घेतला. ही घटना बुधवारी (१० जुलै) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. आग लागताच चालकाने उडी घेतल्याने तो बचावला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रेलरच्या (आरजे ५२, जीए ३१८१) कॅबिनमध्ये अचानक आग लागली. ही आग लागताच चालकाने तातडीने ट्रेलर जागेवरच थांबविला व बाहेर पडला. या विषयी काही नागरिकांनी नशिराबाद पोलिस व जळगाव मनपाच्या अग्नीशमन विभागाला माहिती दिली. एक बंब घटनास्थळी पोहचला व आग विझविण्यात आली. नशिराबाद पोलिस ठाण्याचे…

