Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, जिल्ह्यातील २७ यात्रेकरू ठार !
    क्राईम

    नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, जिल्ह्यातील २७ यात्रेकरू ठार !

    editor deskBy editor deskAugust 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भुसावळनजीकच्या वरणगाव परिसरातील भाविकांची बस शुक्रवारी नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वच भाविक भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. सदर भाविक पोखरा येथून काठमांडूला (क्र. यूपी ५३ एफटी ७६२३) जात होते. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीकाठी दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते. ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच नेपाळच्या सीमेवर असलेल्या महाराजगंज (उत्तर प्रदेश) जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

    मिळालेल्या माहितीनुसार, २७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली आहे. रामजीत ऊर्फ मुन्ना, सरला सुहास राणे (वय ४२). भारती प्रकाश जावळे (६२), तुळशीराम तावडे (६२), सरला तावडे (६२), संदीप राजाराम सरोदे (४५), पल्लवी संदीप सरोदे (४३), अनुप हेमराज सरोदे (२२), गणेश पांडुरंग भारंबे (४०), नीलिमा सुनौल धांडे (५७), पंकज भागवत भंगाळे (४५), परी गणेश भारंबे (८), अनिता अविनाश पाटील, विजया कडू जावळे (५०), रोहिणी सुधाकर जावळे (५१), प्रकाश नथ्थू कोळी (५०) यांचा समावेश आहे.

    जळगाव येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे काल्याचे कीर्तन २१ रोजी झाले. या कथेसाठी जळगाव आणि इतर ठिकाणाहून जवळपास १५०० भाविक अयोध्येला गेले होते. या सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देव दर्शनासाठी तीन बसेसमधून रवाना झाले. त्यापैकी एक बस दरीत कोसळली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.