जळगाव : प्रतिनिधी पोलिस ठाण्याच्या आवारात साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विषारी औषध गेल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय दिलीप गोयर (वय ३९, रा. पहूर, ता. जामनेर) असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विजय दिलीप गोयर हे आई, पत्नी, दोन मुलं यांच्यासह पहूर येथे वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून पहूर पोलिस ठाण्यात स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारात स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे त्यातील…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी गेल्या चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीला घरगुती वादातून लाकडी दांड्याने मारहाण करत पतीने ठार केले. ही घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे रविवारी रात्री घडली. सोमवारी सकाळी या महिलेचे नातेवाईक गोद्री येथे पोहोचले त्यावेळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. विशाल चव्हाण नावाच्या पतीसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, काजल चव्हाण (१८, रा. गोद्री, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. मुसळी फाटा (ता. धरणगाव) येथे तिचे माहेर आहे. यंदा २८ एप्रिल रोजी तिचा विवाह विशाल याच्याशी झाला होता. रविवारी रात्री पती-पत्नीत घरगुती वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन विशालने काजलच्या तोंडावर व नाकावर…
मेष राशी दिवसाची सुरुवात तणावाने होऊ शकते. नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. संयम ठेवा. अन्यथा केलेले काम बिघडू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामासह इतर जबाबदाऱ्या मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी रस वाटेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी राजकारणात रुची वाढेल. एखाद्या कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त धावपळ करावी लागेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास घातक ठरू शकतो. कुटुंबात काही सुखद घटना घडू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची बातमी मिळेल. ऑटोमोबाईल उद्योगाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश…
रावेर : प्रतिनिधी जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरु आहे. यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील एका घराची भिंत कोसळली. दैव बलवत्तर असल्याने कुटुंबातील सर्व बचावले मात्र काही सदस्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी हे त्याठिकाणी पोहचले. कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांनी उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य आणि काही आर्थिक मदत दिली. यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणाऱ्या बाळू भगवान सोनवणे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसली…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेत चक्कर येऊन पडल्याने नऊ वर्षांच्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनवेल येथील आदिवासी आश्रमशाळेत फुलसिंग पहाडसिंग बारेला हा नऊ वर्षाचा विद्याथ शिकत होता. आज सकाळी अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. मयत फुलसिंग बारेला हा हिंगोणा येथील रहिवासी होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अजून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पवन…
जळगाव : प्रतिनिधी येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होते. त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आ. शिरीष चौधरी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे,प्र कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाबरोबर गरीब…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशात आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये पुन्हा हिंसाचार झाले. रविवारी झालेल्या संघर्षात 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चकमकीत डझनभर लोक जखमीही झाले. या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशात आपल्या नागरिकांना संपर्कात राहण्यास आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यासाठी भारताच्या सहाय्यक उच्चायुक्ताने +88-01313076402 आपत्कालीन क्रमांक जारी केला. बांगलादेशातील आरक्षण प्रणालीत 1971 मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील निदर्शनांनी रविवारी पुन्हा जोर धरला. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा मागणी लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात पोलिस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 200 हून…
जळगाव : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशा जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडी नाही आता वेग आला आहे. त्यात धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सामूहिक राजीनामांमध्ये पदाधिकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की, मंत्री अनिल पाटील, जिल्हा बँक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची कोणत्याही समितीवर नियुक्ती नाही. तसेच कोणतेही काम होत नाहीत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण शिवसेना भाजपा सोबत सत्तेत आहोत वर्ष उलटूनही कोणत्याही तालुक्याच्या कमिटीवर आपल्या कार्यकर्त्याची नियुक्ती होत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात मोठी आघाडी घेतली असून त्यांनी विधानसभेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. आपण राज्यातील जवळपास 250 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार मनसेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंढरपूर विधानसभेमध्ये समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजय चौधरी शिवडी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार…
धुळे : वृत्तसंस्था तालुक्यातील लळींग आणि चौगाव गावात सर्पदंशामुळे दोन बालकांनी आपला प्राण गमावल्याची घटना घडली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यात एका बालकासह बालिकेचा समावेश असून या प्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लळींग गावात दुर्गा सोमा पवार (वय 7 रा. लळींग ता. धुळे) ही बालिका तिच्या मैत्रिणीच्या राहत्या घराच्या पाठीमागे खेळत असताना सर्पाने दुर्गाच्या उजव्या पायाला दंश केला असता उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती दुर्गा हिचा मृत्यू झाला. डॉ. अर्जुन यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात…

