Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील तामसवाडी येथे मटनच्या दुकानातील रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आडगाव येथील विकास हरदास राठोड हे तामसवाडी येथे दि. ४ रोजी मटन घेण्यासाठी गेले. याठिकाणी हेमंत उर्फ नाट्य मच्छिद्र पवार (वय २२, रा. तामसवाडी, ता. पारोळा) याने राठोड यास मटन दुकानात असलेल्या रांगेतील नंबरच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील चाकू काढत राठोड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये राठोड यांच्या डाव्या खांद्याला दुखापत केली झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हेमंत उर्फ नाट्य पवार या तडीपार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दापोरा येथे कर्जाच्या जाचाला कंटाळून दशरथ भीमराव तांदळे (वय ५२, रा. दापोरा) या शेतकऱ्याने गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांदळे हे पत्नी व मुलासोबत दापोरा येथे वास्तव्याला होते. दुपारी घरी कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेतला. त्यांच्या मुलाने दरवाजा उघडल्यानंतर प्रकार उघडकीस आला. तांदळे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता तांदळे, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. ते दापोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक तुकाराम भीमराव…

Read More

यावल : प्रतिनिधी शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला तीन जणांनी आठवडी बाजारातून घेऊन गेले. आणि तिला तालुक्यातील एका गावात नेऊन झोपडीत दोन दिवस ठेवले आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ही अल्पवयीन मुलगी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील आठवडे बाजारात आली होती. तेथून तिला दोन पुरुष आणि एका महिलेने तालुक्यातील एका गावात नेले. या घटनेनंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तेथून आणत कुटुंबाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस…

Read More

रावेर : प्रतिनिधी जळगावमधील रामेश्वर कॉलनी परिसरातील शाळकरी मुलगा रावेरमध्ये सापडला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलाने अपहरण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रावेर आणि जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीतील शाळकरी मुलगा मंगळवारी रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे रडत येत होता. त्यावेळी रावेरमधील रहिवासी विक्रम राठोड यांच्या नजरेस पडला. राठोड यांनी मुलाला धीर दिला. आणि त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने अपहरण झाल्याचे सांगितले. राठोड यांनी मुलाला पोलिसांकडे नेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाने रामेश्वर कॉलनीतील एका दुकानाजवळ कारचालकाने पत्ता दिला.…

Read More

मेष राशी महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल. पण परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रात नवीन ज्ञान आणि ओळख वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची गरज भासेल. खाजगी व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास फायदा होईल. शेतीच्या कामात लोकांना काही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल. राजकारणाच्या क्षेत्रात प्रचंड जनसमर्थन मिळाल्याने राजकीय वर्चस्व वाढेल. वृषभ राशी दिवस आनंदाचा, लाभाचा आणि प्रगतीचा असेल. काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच सांगू नका. अन्यथा काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक शिक्षण द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडथळे येतील. काही…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निराश होऊ नका, मी तीन महिन्यांत महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. ते नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त केला. आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली. त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात, निराश होतात. पण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे वागणे सोडावे, आता मी तीन महिन्यात आपले सरकार आणतो. आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र यानंतर मोसमी पाऊस विश्रांती घेणार आहे. 9 आणि 10 तारखे नंतर राज्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार असा अंदाज आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील विदर्भ विभागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये दररोज भाग बदलत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतीवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागांमधील पंचनामे करुन, तत्काळ शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकरी आयुष प्रसाद व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला होता. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असून, यामुळे खरीपच्या पीकांचे नुकसान होत आहे. दररोज होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन, नांगरणी, फवारणी ही कामे देखील करता येत नाहीत. शेतांमध्ये गवत वाढले आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी एका तरुणाने आपल्या मित्राला फोनवर ‘मित्रा माझा हा तुला शेवटचा फोन आहे, यापुढे माझा तुला कधी फोन येणार नाही. मी तुला पुढे त्रास देणार नाही’… असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. किरण रमेश शिंपी (वय २२, रा. शिंदी, ता. भडगाव, ह.मु, रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. किरण शिंपी हा तरुण आई, भाऊ आणि वहिनीसोबत भडगाव तालुक्यातील शिंदी येथे वास्तव्याला होता. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या अडीच वर्षांपासून तो जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका ठिबक कंपनीत कामाला होता. तसेच रामेश्वर कॉलनीत एका भाड्याच्या रूममध्ये तो…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू आहे. पोलिस प्रशासनातर्फे वारंवार कारवाई होत आहे. असे असली तरी गुटखा तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटखा तस्करी करणारी एक कार पकडली. या कारमध्ये ५ लाखांचा गुटखा आढळला. गुटख्यासोबतच ७ लाखांची कारही जप्त केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सोमवारी सकाळी आमदार चारठाणा येथे जात असताना त्यांच्या सुरक्षारक्षकाने एक संशयास्पद जात असलेले वाहन अडवले असता त्या वाहनात अवैधरीत्या गुटखा तस्करी होत असल्याचे आढळून आले. यानंतर हे वाहन (एम. एच. ०२/ बीएम…

Read More