मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या राज्यातील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दरम्यान राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. यानंतर सांगलीत जाहीर सभेला संबोधित करताना, “…काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये आहे”, असे स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, पूर्वी राजकारण व्हायचे, पण आज वैचारिक लढा सुरू आहे. भारताला सामाजिक प्रगती हवी आहे. पण त्याचा फायद काही निवडक लोकांनाच मिळत आहे. देशातील २०, २५ उद्योगपतीचे १६ लाख कोटी रूपये कर्ज सरकारने माफ केले. उद्योगपतींचे कर्ज माफ झाले, शेतकऱ्यांचेही झाले पाहिजे, अशी घणाघाती टीका राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर केली. काँग्रेसच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे ७० कोटी कर्ज माफ…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राज्यात सुरु असतांना नुकतेच अजित पवारांच्या महिला पदाधिकाऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहे. नुकतेच विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून हा नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी स्पष्ट मत मांडत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यास तीव्र विरोध केला आहे. तुम्ही एकाच महिलेला किती पदे देणार? असा कळीचा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून आपल्या 3 नेत्यांना विधान परिषदेवर पाठवणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे व सिद्धार्थ कांबळे यांना संधी दिली जाण्याची…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी सपत्निक अर्थात माजी महापौर सौ.सीमाताई सुरेश भोळे दोघांनी धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले. यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता. याप्रसंगी आ.राजूमामा भाळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100…
जळगाव : प्रतिनिधी शेतामध्ये झालेल्या रस्त्याच्या वापराच्या वादातून इसम महिलेच्या अंगावर धावून गेला. त्यांच्यासोबत असलेल्या तिघांनी महिलेसोबत झटापट करुन तिचा विनयभंग केला. ही घटना दि. ३ सप्टेंबर रोजी पिलखेडा गावातील शेतात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ५३ वर्षीय महिला वास्तव्यास असून त्यांचे पिलखेडा शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात दि. ३ सप्टेंबर रोजी शेत रस्ता तयार करण्यात आला. तो रस्ता वापराच्या वादातून प्रकाश धोंडू कोळी हा लाकडी दांडा घेवून महिलेच्या अंगावर धावून गेला. तर त्याच्यासोबत असलेल्या शांताराम चैत्राम कोळी (साळुंखे), महेंद्र शांताराम कोळी, जितेंद्र शांताराम कोळी यांनी महिलेसोबत वाद घालीत झटापट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी १४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या टोलमाफी…
भुसावळ : प्रतिनिधी तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यात तीन जणांना ताब्यात साडयात आले. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. बाजारपेठ पोलिसांनी नकली नोटा घेऊन आलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हे संशयित जळगाव, भुसावळ व रावेर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या नोटा संशयित आरोपींनी कुठून आणल्या? याआधी किती वेळा त्यांनी बाजारात नकली नोटा विक्री केल्या? त्यांचा गॉडफादर कोण? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतर समोर येऊ शकतात.
जळगाव : प्रतिनिधी पायी जात असलेल्या दिलीप जोरसिंग राठोड (४५, रा. रामनगर) यांच्या अंगावर दुचाकीस्वार महेंद्र मधुकर साळुंखे (रा. मेस्को मातानगर) या मूकबधिराने ज्वलनशील पदार्थ टाकल्याने पादचारी भाजला गेला. यात दुचाकीस्वाराच्याही चेहऱ्यावर हा पदार्थ उडाल्याने त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. ही घटना ३ सप्टेंबर रोजी मेहरून स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी मूकबधिरविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसर, मजुरी काम करणारे दिलीप राठोड हे ३ सप्टेंबर रोजी मेहरून स्मशानभूमी परिसरातून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार महेंद्र साळुंखे हा त्यांच्याजवळ आला व त्याने बाटलीमधील ज्वलनशील पदार्थ राठोड यांच्या…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. दगडफेकीत पोलिसासह पाच ते सहाजण जखमी झाले आहे. या दरम्यान, पोलिस वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्णीतील एका व्यायामशाळेत बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. एकमेकांवर दगड व विटा फेकण्यात आल्या. काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींची तोडफोड केली. पोलिस पथक काही क्षणातच या भागात दाखल झाले. यावेळी पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात एका पोलिसासह दोन्ही गटातील पाच…
मेष राशी विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील. विपरीत लिंगाचा जोडीदार व्यवसायात उपयुक्त ठरेल. वडिलोपार्जित संपत्तीवरून कुटुंबात वाद होऊ शकतात. कोणाचे म्हणणे ऐकू नका. आपल्या विवेकबुद्धीने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवा. ग्रूमिंगमध्ये रस राहील. राजकारणात वरिष्ठ अधिकाऱ्याशी जवळीक वाढेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. वाहन सुखसोयी वाढतील. वृषभ राशी तुरुंगवासातून मुक्तता होईल. जुन्या प्रकरणात तुमचा विजय होईल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील. बिझनेस ट्रिपला जाऊ शकता. नोकरीत बढतीचे योग येतील. राजकारणात मोठे पद मिळू शकते. काही महत्त्वाच्या योजनेवर काम कराल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसच्या जवळ असण्याचा फायदा मिळेल. जमीन, इमारती, वाहने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारने गेल्या महिन्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती. त्यानंतर अनेक विरोधकाकडून सरकारवर हल्लाबोल देखील झाला होता. तर सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असतांना मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आहे. मात्र, ही मागणी करतानाच त्यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली आहे. शेतकरी देखील सरकारचा लाडका आहे, हे सरकारने दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांना मदत करताना सरकारने मदतीचा हात अजिबात आखडता घेऊ नये. सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे, लक्षात…

