Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी रात्री जेवण केल्यानंतर झोपेत उलटी घशात अडकल्यामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जिज्ञासा नरेंद्र निकुंभ (वय १६, रा. गणपतीनगर) असे मयत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिज्ञासाचे वडील नरेंद्र निकुंभ हे शहरातील जीएसटी विभागात जीएसटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिज्ञासा ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता जिज्ञासाचे क्लास असायचे, त्यासाठी पहाटे ५ वाजता जिज्ञासाची आई तिला उठविण्यासाठी गेली असता, तिचे शरीर पूर्णपणे थंड पडलेले आढळून आले लागलीच जिज्ञासाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना, शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शालीग्राम तुकाराम पाटील (वय ६५, रा. सामरोद, ता. जामनेर) हे बुधवारी जळगाव शहरात कामानिमित्त आले होते. दुपारी काम संपल्यानंतर, २.३० वाजता जळगाव बसस्थानकात आले. त्याठिकाणाहून दुपारी ३ वाजता जामनेर बसमध्ये चढत असताना, त्यांच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवून नेली. बसमध्ये बसल्यानंतर खिशातील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी बसमधून उतरून थेट जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी शालीग्राम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील माजी उपसरपंच सौ.अनिता संजय चिमणकारे यांची शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशाने जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाच्या मागासवर्गीय महिला जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊ नन्नवरे व जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सरीता बी.माळी(कोल्हे) यांच्या स्वाक्षरी पत्राद्वारे करण्यात आली. या नियुक्ती बद्दल जळगाव तालुका शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले

Read More

मुंबई :  वृत्तसंस्था भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, माजी नगराध्यक्ष सावदा राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, अपर आयुक्त सुदर्शन नगरे, निलेश अहिरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आमदार मंगेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून खोके कमवून या खोक्यांच्या भरोसे तालुक्यातील जनतेला विकत घेण्याची भाषा गद्दाराचा निष्क्रिय मुलगा सध्या करीत असून यामुळे जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात चीड आज देखील कायम असून गेल्या जि.प.निवडणुकीत एका खेडेगावात संस्थाचालकाच्या प्रचारासाठी गेलेल्या शिक्षकाला रक्त पडेपर्यंत मारहाण करून या दलित समाजाच्या शिक्षकाला मारहाणीचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला होता. इतका उदमाप या खोक्यावाल्याच्या मुलाला असून दलित समाज आजही या घटनेला कधीही विसरू शकत नाही. विशेष म्हणजे त्या काळात राजकीय दबाव आणून तो गुन्हा मागे देखील घेण्यात आला. या प्रकरणात खोक्यावाल्याचा मुलगा फरार देखील होता. पारोळा तालुक्याला या निष्क्रिय मुलाचे…

Read More

मेष राशी दिवसाच्या पूर्वार्धात स्थिती सकारात्मक राहील. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता कमी असेल. संयम ठेवा. अनावश्यक वादात पडू नका. अति लोभाची परिस्थिती टाळा. चांगल्या मित्रांसोबत अधिक सकारात्मक वागणूक उपयुक्त ठरेल. कार्यक्षेत्रात कामे होतील. अभ्यासाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ राहील. शत्रूपासून सावध रहा, तो तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. धार्मिक कार्य, पूजा इत्यादीमध्ये रुची वाढेल. वृषभ राशी महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, विशेषत: कार्यक्षेत्राबाबत. लांबचा प्रवास करताना काळजी घ्या. कोणावरही घाईघाईने विश्वास ठेवू नका. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. छोट्या प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अडचणींचा असेल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आघाडी व महायुतीमधील नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध सुरु झाले असून भाजपचे माजी खा.रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले कि, युतीच्या काळामध्ये जागा वाटपाचा निर्णय, निवडणुकीची रणनीती आतापर्यंत ‘मातोश्री’वर ठरवली जात होती. मात्र आता मातोश्रीच्या बाहेर निघून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारात जाऊन उभे राहण्याची पाळी या राज्यातील जनतेने तुमच्यावर आणली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मातोश्रीवरच्या बैठका आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होऊ लागल्या असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धामणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पियुष रमेश गोसावी (वय २२, रा.धामणगाव ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून तो गावामध्ये आई, आजी, आजोबा यांच्यासह राहत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पियुष गोसावी हा शेती काम करून उदरनिर्वाह करीत होता. मयत तरुण हा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांचा पुतण्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेनंतर तो घरी आला, त्यावेळेला त्याची आजी ओट्यावर बसलेली होती. पियुषने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या मागील वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी फुट पाडून महायुतीमध्ये सामील झाल्यावर त्यानंतर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भेटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेचा तापले होते मात्र नुकतेच अजित दादांनी मोठे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना मी विधानसभेत वरिष्ठ आहे. पण मी नव्वदच्या बॅचचा आहे. पण ते सगळे पुढे गेले, मी मागेच राहिलो, तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितले इतके आमदार आणलात तर मुख्यमंत्री करतो, मला जर सांगितले असते तर सगळी पार्टी घेऊन आलो असतो, शेवटी नशिबात असते तेच होते, असा मिश्कील टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ठाण्यात…

Read More