Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी घर बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणावेत, तसेच लग्नात एसी व बुलेट दिली नाही म्हणून उजमाबी रिजवान शेख (वय २४) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१९ पासून ते जुलै २०२४पर्यंत सुरू होता. तसेच पतीने २२ जून २०२४ रोजी ‘मी तुला पहिला तलाक देत आहे’ असा मजकूर लिहून पत्र पाठविले. याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती रिजवान मोहम्मद रफिक शेख याच्यासह सासरच्या चारजणांविरुद्ध बीएनएस कलम ८५, ११५(२), ३५२, ३ (५), मुस्लिम महिला विवाह अधिनियम २०१९ कलम ४ प्रमाणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहराच्या आमदारांना महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून नियोजन करता आले नाही. तसेच शहरातील अनेक कामेही विकासात्मक झाली परंतु त्या दर्जाची झाली नाही. भाजपाच्या पाठीशी पारंपारिक असलेला कोळी समाज हा ‘मामा’च्या कामगिरीवर नाराज असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. तसेच मराठा समाजही अंतर ठेवून असल्याने आगामी निवडणुकांमध्ये हे चित्र जळगाव शहरासाठी भाजपाला धक्कादायक ठरणार आहे. जळगाव शहर भाजपाचा बालेकिल्ला आहे. परंतु शहरात पाहिजे त्या प्रमाणात लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. मामा फक्त मामा पार्टी असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्वभावाने खूप चांगले आहेत परंतु व्हिजन हे फार नसल्यामुळे शहराची वाताहात होत असतांना दिसत आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नेहमीच विविध निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता तशी उपभोगली परंतु गेल्या पाच वर्षातील आर्थिक आलेख पाहता गद्दारी व खोक्यांमुळे फार मोठा उंचावला असून जळगाव शहरातील सहकाराची शंभर कोटीची जागा केवळ पाच ते सहा कोटीमध्ये पचवल्याचे प्रकरण ताजे आहे. हे सर्व खोक्यांच्या मस्तीवर चालू आहे. सत्तेचा कसा उपभोग करायचा हे खोक्यावाल्याकडून समजून घ्यावे. सहकार विभागाचे उपनिबंधक यांना हाताशी धरून कागदाची फेरफार करून पद्धतशीरपणे शंभर कोटीची जागा पाच ते सहा कोटी मध्ये या गद्दाराच्या पुत्राने पचवली असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये नजरांना रक्कम देखील सत्तेच्या बळावर भरली नाही. महसूल विभागाला मॅनेज करून ते तीन कोटी…

Read More

मेष राशी उद्योगात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या ठिकाणी सजावटीवर लक्ष दिले जाईल. नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामातील अडचण दूर होईल. राजकारणात वर्चस्व मिळेल. संघर्षाची स्थिती वाढेल. कला, अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कुशल व्यवस्थापनाचे कौतुक होईल. बौद्धिक कार्यात चांगली बुद्धिमत्ता असेल. विदेश प्रवासाला जाऊ शकता. गृहस्थ जीवनात जीवनसाथीकडून सहकार्य आणि साथ मिळेल. व्यापारात नवीन मित्र फायदेशीर ठरतील. वृषभ राशी वाहन अपघात होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त ताणतणाव असल्यामुळे मानसिक तणाव वाढेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. व्यवसायात खर्च जास्त…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला अचानक आग लागल्याची थरारक घटना हवेली तालुक्यातील पुणे – सोलापूर मार्गावर घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. पण संपूर्ण बस भस्मसात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलपुढे शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमरास ही घटना घडली. या बसमधून 17 प्रवाशी प्रवास करत होते. ही बस हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येत होती. अचानक बसधून धूर निघत असल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात आली. हे पाहून त्यांनी एकच आरडाआरोडा सुरू केला. यामुळे चालकाने तत्काळ बस…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या सभेत बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांसमोर चुकीची कबूल दिली आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ केले, असे निर्णय घेतले असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. आता कांदा निर्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला ३६ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती दिल्यानंतर त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त येथे सुनावणी सुरू असतांना निकाल लावण्यासाठी लावून देतो असे सांगून ५० हजारांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रकांत पाटील वय ५७, रा. जळगाव) असे अटक केलेल्या कामगार निरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी…

Read More

हिंगोली : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते दि.८ रोजी हिंगोली शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे हिंगोलीत मनसे विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, आतापर्यंत मनसेच्या वतीने 4 जणांची उमेदवारी निश्चित केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी नटसम्राट केशवराव भोसले यांची 134 वी जयंती आहे. मात्र त्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रात्रीपासून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रन मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि होमगार्ड हे जेवणासाठी शिवकॉलनीजवळील एका हॉटेमध्ये गेले होते. त्यांच्या समोरील टेबलावर बसलेल्यांना पोलिस कर्मचाऱ्याने हळू बोला असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांच्यामध्ये तुफान राडा झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रारीची नोंद करण्यात आली असून जखमी पोलिस कर्मचाऱ्यासह होमगार्डवर खासगी रुग्णालयात उपचार सुर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपुर्वी जून्या वादातून कालिंका माता चौफुली परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घण खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच रात्री उशिरापर्यंत महामार्गात सुरु…

Read More