Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskAugust 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी 2.30 वाजता सागर पार्कवर होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

    सागर पार्कवर होणार असलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला जवळपास 40 हजार बहिणीसह इतर जिल्ह्यातील लोकं, सरपंच उपस्थित राहतील. त्या दृष्टीने तयार करण्यात आल्याची माहिती दिली. शहरात विविध तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात दत्त मंदिर ते सिंध कॉलनी रोड, डी मार्ट ते काव्य रत्नावली चौक, खान्देश मॉल पार्किंग, जी. एस. मैदान, …. अशा पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.